शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वर्धा जिल्ह्यात भाविकांची जीप कोसळून दोन ठार, १६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:53 PM

नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला.

ठळक मुद्देजखमींना वडनेरच्या रुग्णालयात केले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला. जखमींना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. २९ के.डी. ५०४८ क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने यवतमाळ येथील १८ जण नागपूरला देवदर्शनाला गेले होते. परतीच्या प्रवासात भिवापूर शिवारात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते एका सिमेंटपुलावरून खाली कोसळले. यात नागोराव कर्णूजी गायकवाड (८९), रा. राजुर, इंझाळा, वणी, व कल्पनाबाई लालाजी दारोंडे (५५), ता. पांढरकवडा यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये ज्ञानेश्वर पुंडलिक गायकवाड, पूजा दादाराव बेसेकर, संगलबी मोहम्मद खान पठाण, कल्पना दिवाकर तडस, रविना एकनाथ धुर्वे, शीतल दादाराव बेसेकर, निर्मला लक्ष्मण राऊत, रोशनी वाडे, दिक्षा बेसेकर, भगीरथा बेसेकर, भावना राऊत, राणी दीपक राऊत, योगेश गायकवाड, राजनंद गायकवाद, सचिन गायकवाड, गौतम गणवीर यांचा समावेश आहे. वाहनचालक गौतम गणवीर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात