शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस अतिपावसाचे; नागरिकांनो सावध रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 05:00 IST

जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी जिल्ह्यात चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. वर्धा, सेलू, देवळी, हिंणघाट, समुद्रपूर व आर्वी या सहा तालुक्यातील २३ मंडळामध्ये मंगळवारच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखीच भर घातली आहे. नदी-नाल्यांचे पूर घरात आणि शेतशिवारात शिरल्याने मोठा फटका बसला आहे. महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आता हा पाऊस नकोसा झाला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असल्याने घराच्या बाहेर पडणेही कठीण झाले आहे. बुधवारी काहीशी पावसाने उसंत घेतल्याने आता पावसापासून सुटका होईल, असे अपेक्षा होती. मात्र, पुन्हा ढगांची गर्दी व्हायला लागली असून भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारला गडगडाट आणि विजांसह अती पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडात होत असताना कुणीही घराबाहेर पडू नये, तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये आणि पुराच्या पाण्यापासून लांब राहावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी जिल्ह्यात चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. वर्धा, सेलू, देवळी, हिंणघाट, समुद्रपूर व आर्वी या सहा तालुक्यातील २३ मंडळामध्ये मंगळवारच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखीच भर घातली आहे. नदी-नाल्यांचे पूर घरात आणि शेतशिवारात शिरल्याने मोठा फटका बसला आहे. महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

ती केवळ अफवा, आधी मिळणार सूचना- सर्वत्र नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच काहींनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. नुकताच एक चित्रफित व्हायरल होत असून त्यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले असून गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे सांगितले जात आहे. परंतु ती चुकीची माहिती असून या प्रकल्पाचे केवळ ३ गेट ५ सेमीने उघडण्यात आले आहे. यातून १२.७३ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्व सूचना दिल्या जातात, असे निम्न वर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले आहे.

स्थानिक पूर परिस्थिती पाहून शाळांबाबत निर्णय घेण्याचे निर्देश...- जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार असल्याने हवामान खात्यानेही आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे काही शाळांनी सुट्या दिल्या असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही शिक्षकांना तशा सूचना केल्या आहे. पुरपरिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होऊ नयेत. किंवा कोणत्याही गावाला पुराचा धोका असल्यास स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने यासंदर्भात निर्णय घेण्याची मुभा शिक्षण विभागाने दिली आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर