शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:07 IST

प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते

वर्धा - शहरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. स्थानिकांच्या घरात घुसून ते वयोवृद्धांवरही अचानकपणे हल्ला करत आहे. विशेष म्हणजे वन विभागाचं याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच, चवताळलेल्या माकडाच्या हल्ल्यात एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळीच घडली. शहरातील सय्यद साँ-मील परिसराती ही घटना असून नंदकिशोर हुडे (वय५४) असे जखमी कामगाराचे नाव आहे.   प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते. यावेळी, साँ-मीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन माकडांत तुंबळ युद्ध सुरू होते. त्याचवेळी नंदकिशोर यांनी प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील चवताळलेल्या दोन माकडांनी थेट त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्या त्यांच्या उजव्या पायाला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले. नंदकिशोर यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी गंभीर जखमा असल्याने दहा टाके पडले आहेत. 

दरम्यान, सदर परिसरात माकडांचा मुक्त संचार असतो आणि अनेकजण माकडांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. माकडांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही तालुक्यातील 15 वी घटना असल्याचे यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  

टॅग्स :wardha-pcवर्धाMonkeyमाकडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर