शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

साडेतीन लाखांचा दारूसाठा व साहित्य जप्त

By admin | Updated: September 18, 2015 01:59 IST

दारूविक्रीवर आळा घालता यावा म्हणून जिल्ह्यात आॅपरेशन वॉश आऊट राबविले जात आहे. यात वर्धा शहरात गावठी दारूसाठा नष्ट करून साहित्य जप्त करण्यात येत आहे.

वर्धा : दारूविक्रीवर आळा घालता यावा म्हणून जिल्ह्यात आॅपरेशन वॉश आऊट राबविले जात आहे. यात वर्धा शहरात गावठी दारूसाठा नष्ट करून साहित्य जप्त करण्यात येत आहे. बुधवारीही शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत साडे तीन लाख रुपयांचा दारूसाठा व साहित्य जप्त करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एम.पी. बुराडे, पोलीस निरीक्षक वी.आर. मगर यांच्यासह शहर पोलिसांनी आनंदनगर व पुलफैल भागात बुधवारी पहाटे दारूबंदी वॉश आऊट मोहीम राबविली. या कारवाईमध्ये २९ मोठे लोखंडी ड्रम १४ हजार ५०० रुपये, ११ प्लास्टीक ड्रम किंमत २ हजार २०० रुपये, २९ लोखंडी ड्रममधील कच्चा मोहा सडवा, रसायण किंमत २ लाख ९० हजार रुपये, ११ प्लास्टिक ड्रममधील कच्चा मोहा सडवा रसायण किंमत ५५ हजार रुपये, ९ काळ्या बुडाचे लोखंडी ड्रम किंमत २ हजार ७०० रुपये आणि इतर भट्टी साहित्य असा एकूण ३ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सडवा, मोहा, रसायन नष्ट केले गेले. दररोज कारवाई होत असताना तेवढेच साहित्य दुसऱ्या दिवशीही आढळते. दारू गाळणे थांबत नसल्याने कारवाईचा परिणाम जाणवत नसल्याचे दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)