शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना वीस लाखांचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:34 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.

ठळक मुद्देअवचितराव सयाम यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणाच्या काळात विम्याचे कवच मिळावे यासाठी ऑल इंडिया एससी, एसटी, ओबीसी असोसिएशनचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष अवचितराव सयाम यांनी पाठपुरावा केला. त्यांनी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात बँकांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जन-धन खात्यातील रक्कम काढणाऱ्या बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये कोण कोरोनाग्रस्त असेल याचा अंदाज येत नाही. त्यातही कुणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल याचाही नेम नसल्याने शाखेत कार्यरत कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे तर कुठे मृत्यू झाल्याच्याही घटना घडत आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात देशाची आर्थिक बाजू अतिशय मजबूतपणे बँक कर्मचारी सांभाळत आहेत. केवळ मास्क व सॅनिटायझर लावून कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत पण, बँकेत दररोज होणाऱ्या गदीर्ने धोका आणखीच वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने बँक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलसारखे ड्रेस व सुविधा पुरवावी, अशी मागणी ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया कर्मचारी असोसिएशनच्या विदर्भ विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBank of Indiaबँक ऑफ इंडिया