शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या तिहेरी अपघातात १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:51 IST

दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला.

ठळक मुद्देईसापूर शिवारातील अपघात : बस चालक व वाहक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. बसमधील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक व वाहक, हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, बस व दोन्ही मालवाहु ट्रक एकाच दिशेने नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. उमरेड डेपोची बस क्र. एमएच ४० वाय ५१६० ही यवतमाळमार्गे नागपूरकडे जात होती. दरम्यान, बसच्या मागाहून सोयाबीन घेऊन भरधाव येणाºया मालवाहू ट्रक क्र. एमएच २९ एमओ ५०८ ने बसला जबर धडक दिली. या धडकेमुळे अनियंत्रित झालेली बस समोर असलेल्या तुरीच्या ट्रक क्र. सीजी ०४ जेडी ९०३९ वर आदळली. या अपघातात बसच्या दोन्ही बाजूला जबर धडक बसल्याने बारा प्रवासी जखमी झाले. काही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविले.जखमींमध्ये गायत्री धोटे व गणेश देशकर रा. देवळी, विशाल वाघाडे व चंद्रकला मारोती गिरी रा. कळंब, तुफान जाधव आर्णी, बेबी भोळे कामरवाडा, मयूरी कुथे नेरी, भारती माने हिवरा, नारायण पारिसे तांबा, कुसूम नागरे यवतमाळ, श्रीकृष्ण पेंदाम व पुनम बर्धिया वातोडा यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते. लोकांनी जखमींना खासगी, सरकारी वाहनाने रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नेमकी उकल झाली नसल्याने पोलिसांनी अंदाजे घटनाक्रम विषद केला. जखमींचे बयाण व चौकशी अंती गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात