शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील वायगाव (हळद्या) ची हळद जाणार आता दुबईला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:29 IST

भौगोलिक मानांकन प्राप्त : २०२५ मध्ये १.५ मे. टन ओली हळद होणार निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन जी. आय. टॅग क्रमांक २६८ प्राप्त झाले आहे. हे मानांकन २०१६ मध्ये वायगात हळद शेतकरी उत्पादक कंपनी लि. गिरड ता. समुद्रपूर यांनी प्राप्त केले आहे. वायगाव भागातील जमिनीत पिकणाऱ्या हळदीच्या विशिष्ट औषधी गुणधर्मामुळे तिला हे मानांकन मिळाले आहे. विदेशात या हळदीला मागणी असून जिल्ह्यातील वायगाव हळद पहिल्यांदाच दुबई येथे निर्यात करण्यात येणार आहे.

वायगाव हळदीच्या कंटेनरला जिल्हाधिकारी कार्यालयातून ९ मे रोजी जिल्हाधिकारी वान्मयी सी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात येणार आहे. सन २०२५ या वर्षात वर्ध्यातून आत्मा आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टर यांच्या सहकार्याने जवळपास १.५ मेट्रिक टन ओल्या वायगाव हळदीची निर्यात करण्याचे ठरविले आहे. 

शेतकऱ्यांना होणार फायदानिर्यातीमध्ये कृषिन्नोती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, वायगाव (ह.) तालुका समुद्रपूर विदर्भ नैसर्गिक शेतमाल किसान उत्पादक कंपनी लिमिटेड खैरगाव आणि वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनी लि. गिरह, ता. समुद्रपूर या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला. ओल्या हळदीची निर्यात दुबई येथे करण्यात येत आहे. आगामी काळात निर्यातीचे मोठ्या प्रमाणावर पुरवठा आदेश प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

वार्षिक उत्पादन होतेय ५६१.४० मेट्रिक टनवर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील हळद उत्पादक जिल्हह्यांपैकी एक आहे. येथील हवामान आणि जमीन हळदीच्या लागवडीसाठी बऱ्यापैकी अनुकूल आहे. समुद्रपूर तालुक्यात १६०.४० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. यात सिंचनाखालील आणि कोरडवाहू जमिनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील वार्षिक हळद उत्पादन सुमारे ५६१.४० मेट्रिक टन इतके आहे.

वायगाव हळदीची खास वैशिष्ट्येवायगावची हळद गडद पिवळ्या रंगाची, म्हणजेच केशरी रंगाकडे झुकलेली असते. इतर हळदीच्या तुलनेत तिचा रंग अधिक आकर्षक असतो. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण खूप जास्त असते, जे साधारणपणे ६ टक्क्यापेक्षा अधिक असते. कुरकुमीन हे हळदीतील एक महत्वाचे बायो अॅक्टिव्ह संयुग आहे. ज्यामुळे हळदीला औषधी गुणधर्म मिळतात. वायगावच्या हळदीची चव तीव्र आणि सुगंध आकर्षक असतो. त्यात तेल अंश भरपूर असतो. या हळदीची पावडर अत्यंत मऊ आणि बारीक असते. पारंपरिकरित्या, वायगावची हळद जखमांवर आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी मानली जाते. तिच्यातील उच्च कुरकुमीनमुळे तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

 

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा