लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली. हा अपघात रविवारी नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात झाला. यात ट्रॅव्हल्समधील सात प्रवासी जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.
ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST
प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली.
ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक
ठळक मुद्देसात प्रवासी जखमी : नागपूर-अमरावती मार्गावरील घटना