शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

ट्रकने ऑटोला चिरडले, चार ठार, तीन जखमी

By रवींद्र चांदेकर | Updated: August 5, 2024 15:13 IST

केळापूर शिवारातील घटना : सर्व मृतक केळापूरचे रहिवासी

पुलगाव (वर्धा) : येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा मार्गावरील केळापूर गावाजवळ अज्ञात ट्रकने आटोरिक्षाला अक्षरश: चिरडले. या अपघातात ऑटोमधील दोघांचा जागीच, तर दोघांना उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. इतर तीन गंभीर जखमींवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास घडली.

दुर्गाबाई सुरेश मसराम, सतीश नेहारे, सुमित्रा करोती आणि भीमराव पाटील, अशी मृतकांची नावे आहेत. सर्व मृतक केळापूर येथील रहिवासी आहेत. ट्रकच्या धडकेत आटोरिक्षाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे. ऑटोमधील साक्षी नरोडे या महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ऑटोचालक सागर मराठे व इतर गंभीर जखमींना पुलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी सावंगी येथे पाठविण्यात आले आहे.

केळापूर येथील काही गावकरी ऑटोरिक्षाने (क्र. एमएच ३२/बी ७३५६) पुलगाव येथे बाजारासाठी निघाले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या ऑटोला उडविले. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ऑटो पूर्ण क्षतीग्रस्त झाला. घटनास्थळी मृत्युमुखी पडलेले दुर्गा मसराम व सतीश निहारे यांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच केळापूर येथील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

तालुक्यात अपघात सप्ताहदेवळी तालुक्यात या आठवड्यात झालेल्या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी दोन अपघात हे पुलगाव ते वर्धा मार्गावर घडले आहेत. तिसरा अपघात रविवारी देवळीनजीक झाला. आठवडाभरात झालेल्या भीषण अपघातांमुळे तालुका हादरून गेला आहे. वर्धा ते पुलगाव मार्गावर या सप्ताहात पाच जणांना, तर देवळी येथे दोघांना प्राण गमवावे लागले.

आठवडी बाजार उठला मुळावरपुलगाव येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. लगतच्या ग्रामीण भागातील ग्राहक या बाजारात येतात. केळापूर येथील ग्राहकही ऑटोरिक्षाने पुलगावकडे निघाले होते. मात्र, अपघात झाल्याने आठवडी बाजार त्यांच्या मुळावर उठला.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा