शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धान घेऊन जाणारा ट्रक सत्याग्रही घाटात उलटला, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 17:49 IST

नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात धान घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यात वाहनातील तिघे व्यक्ती जखमी झाले. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.

वर्धा : छत्तीसगढ मोहगाव येथून जळगाव जामनेर येथे धान घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला असून यात वाहनातील तिघे व्यक्ती जखमी झाले. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.

एम.एच.४१ ए. जी. ६६७२ क्रमांकाचा ट्रक जळगावच्या दिशेने जात असताना अज्ञात ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून धान भरलेल्या ट्रकला कट मारला. अशातच धानाची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

या अपघातात ट्रकचालक, वाहक तसेच ट्रकमधील एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताची नाेंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार दिगांबर रुईकर, आकाश शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात