शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खदखदला असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

सोमवारी घडलेल्या या अमानवीय घटनेचे पडसाद मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शहरात उमटले. सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको आंदोलन यात महिला, शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवतींनी सहभाग नोंदविला. मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शांततेने आंदोलन करणाऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांनी बनवलेली मानवी साखळी तोडून थेट उपविभागीय कार्यालयाच्या आत प्रवेश केला.

ठळक मुद्देशहर कडकडीत बंद : आरोपीला फाशीच द्या, मोर्चातील नागरिकांची एकमुखाने मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अतिशय क्रूरपणे प्राध्यापिकेवर करण्यात आलेल्या पेट्रोल हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच शाळकरी मुला-मुलींनी एकत्र येत शहरातून मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.सोमवारी घडलेल्या या अमानवीय घटनेचे पडसाद मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शहरात उमटले. सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको आंदोलन यात महिला, शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवतींनी सहभाग नोंदविला. मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शांततेने आंदोलन करणाऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांनी बनवलेली मानवी साखळी तोडून थेट उपविभागीय कार्यालयाच्या आत प्रवेश केला.हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास फासावर लटकवा, अशी एकमुखाने मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांची असंतोषाची खदखद पाहून प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. याशिवाय दिवसभरात शहरात धरणे, निवेदन आणि रास्ता रोकोसारखे आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.स्थानिक नंदोरी चौक परिसरात अंगावर पेट्रोल टाकून जाळल्यानंतर गंभीर जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर आज काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून जनआक्रोश पहावयास मिळाला. मोर्चात हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरुष, लहान मुले नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून उपविभागीय महसूल कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी स्वत: पुढाकार घेत आंदोलनकर्त्यांची बाजू समजावून घेत त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.मोर्चात आमदार समीर कुणावार, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रा. किरण उरकांदे, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अशोक शिंदे, अनिल जवादे, मो. रफिक, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संजय डेहणे, दादा देशकरी, आशीष पर्बत, आकाश पाहाणे, लता घवघवे, दीक्षित, घवघवे, प्रदीप जोशी, मिर्जा परवेझ बेग, नवीन भगत, प्रहारचे गजानन कुबडे, अंकुश ठाकूर, श्रीकांत भगत, नीलेश ठोंबरे, शंकर मुंजेवार, अशोक रामटेके, हाजी मोहम्मद रफीक, अनिल भोंगाडे, शांता देशमुख, डॉ. आदर्श गुजर, माजी सैनिक पुंडलिक बकाणे, मनीष देवढे, ब. रा. चव्हाण, तुषार देवढे, अश्विनी तावडे, सुरेश चौधरी, प्रवीण उपासे, नगरसेवक धनंजय बकाने, रूपेश राजूरकर, चंद्रकांत पिठाडे, प्रमोद गोहणे, सौरभ तिमांडे, अनिल भोंगाडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष सहभागी झाले होते.शहरातील अवैध धंद्यांना आळा घालाइतर तालुक्यांच्या तुलनेत हिंगणघाट तालुक्याचा विचार केल्यास महिला अत्याच्याराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला तालुक्यात सुरू असलेले अवैध व्यवसाय कारणीभूत ठरत आहेत. अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशातच हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेमुळे पोलिसांवरील विश्वास उडण्याची वेळ आली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.पोलीस ठाण्यासह उपविभागीय कार्यालयात निवेदनांची थप्पीतरुणीला जिवंत जाळणाºया आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीने हिंगणघाटच्या ठाणेदारांसह उपविभागीय महसूल अधिकाºयांना देण्यात आले आहे. निवेदन देणाºयांमध्ये शिवसेना, महिला काँग्रेस कमिटी, रिपब्लिकन पक्ष (आ.), राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बहुजन क्रांती मोर्चा, विदर्भ राज्य आघाडी, महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, भीम आर्मी सेना, भारत एकता मिशन, वंचित बहुजन आघाडी, हिंगणघाट बार असोसिएशन यांच्यासह विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा समावेश आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीच्या निवेदनांचा आज हिंगणघाट पोलीस ठाण्यासह उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात पाऊसच पडला.शाळा-महाविद्यालये राहिली बंदसोमवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणघाट बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला येथील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली होती. तर विविध शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी