झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:40 PM2017-10-14T23:40:59+5:302017-10-14T23:41:15+5:30

विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे.

Trees grew; There is no address of flowers, ponds | झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

Next
ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे निघाले बोगस : अडीच लाखांचे पीक बुडाले, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे. तीन एकरातील एकाही झाडाला फुल व बोंडे लागली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या शेतकºयाने तक्रार केली; पण अधिकाºयांनी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे अडीच लाखांचे पीक बुडाले असून अख्खा संसारच उघड्यावर आला आहे. आता नुकसान भरपाई वा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.
बोरखेडी येथील शेतकरी रामदास चंदीवाले यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. यासाठी महाबीजचे तीन पॉकेट बियाणे खरेदी केले. झाडांची उंची झपाट्याने वाढली; पण फुल, बोंड लागलीच नाही. यामुळे रामदास व त्यांची मुले व्यथित झालीत. त्यांनी महाबीजच्या दुकानात जाऊन माहिती दिली. यावर तक्रार करा, असा सल्ला दुकानदारांकडून देण्यात आला.
यानंतर याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघाकडे तक्रार करण्यात आली. तालुका कृषी अधिकाºयांनी तक्रार मिळताच पंचनामा केला. याचा अहवाल त्वरित पाठविला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. रामदास यांनी पिकाचा विमा काढलेला नाही. यामुळे त्यांना काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचेच बियाणे बोगस निघत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. यापूर्वी काही शेतकºयांचे बियाणे बोगस निघाले होते. ते प्रारंभी बदलून देण्यात आले; पण आता पीक काढणीवर असतानाही कपाशीला बोंडेच आली नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
वर्षभरापासून मेहनत घेऊन तथा कर्जबाजारी होऊन अशी वेळ आल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी वा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर काय कारवाई होते, याकडे शेतकºयाचे लक्ष लागले आहे.
पीक विमा न काढल्याने नाकारली मदत
मागील हंगामात पीक विमा योजनेत शेतकºयांची फसगत झाली. यामुळे अनेक शेतकºयांनी यंदा पीक विमा काढलेला नाही. आता बियाणे बोगस निघाल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकºयाला महाबीजने वा शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे; पण विमा काढला नसल्याचे कारण पूढे केले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत महाबीजने भरपाई देणे गरजेचे आहे.

रामदास चंदीवाले या शेतकºयाने तीन एकरात महाबीज बियाणे लावले आहे. कपाशीचे झाड पूर्ण वाढले; पण फुले व बोंडे लागली नाहीत. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. यात खते व फवारणीचे प्रमाण बरोबर दिले नसेल. त्यामुळे वाढ झाली व फळ धारणेची प्रक्रिया खुंटली असेल. याची चौकशी सुरू आहे.
- अजय फुलझेले, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.

Web Title: Trees grew; There is no address of flowers, ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.