हिंगणघाट : निसर्ग वेध मित्रमंडळ व घरपोच फिरते वाचनालय यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत तुकाराम महाराज जयंती उत्सवानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले़ यातून तुकारामांच्या वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरेला नागरिकांनी साद दिली़ स्थानिक इंदिरा गांधी वॉर्डात नगर सेवक चौधरी, वारकरी भजनी मंडळाचे बुरले, बकाने, महेंद्र मोरे, देवराव लोखंडे, गुलाब वाडी, चंपत बालपांडे, रेवतीनाथ भोयर आदींच्या उपस्थितीत घरपोच वाचनालयाचे संयोजक चेतन काळे यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगाच्या ओळी सादर केल्या़ शिवाय वृक्षाबद्दल मार्गदर्शन करून वृक्ष संवर्धन व संगोपनाची प्रतिज्ञा घेतली़ यावेळी उत्साही तरूणांनी इंदिरा गांधी वॉर्डातील संत जगनाडे महाराज यांच्या मंदिरासमोर वटवृक्षाचे रोपण करून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. शिवाय संगोपनाची प्रतिज्ञा घेतली़(तालुका प्रतिनिधी)
निर्सग वेध मंडळाचे वृक्षारोपण
By admin | Updated: March 12, 2015 01:41 IST