शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सेवाग्रामातील वृक्षतोड, देशभरातील गांधीजन एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 14:49 IST

सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गांधी स्मारक निधीव्दारे ‘शांतीपथ’ची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहे. या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वैचारिक वारसा लक्षात घेऊन या मार्गाला ‘शांतीपथ’ म्हणून विकसित करावे, अशी मागणी गांधी स्मारक निधीव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गांधी स्मारक निधी, दिल्ली या अग्रणी संस्थेद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना पाठविलेल्या निवेदनात देशातील गांधी विचारकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १९४० च्या दशकात गांधीजींच्या नेतृत्वात ज्येष्ठ सहकारी प्रभाकर जोसेफ, आर्यनायकम, आण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी ग्रामवासीयांना सोबत घेऊन वर्धा सेवाग्राम मार्गावर असंख्य झाडे लावली आणि जगवली. यात प्रामुख्याने कडुलिंबाचीही झाडे होती. गांधीजींच्या पर्यावरणप्रेमाची जगाला साक्ष देणाऱ्या या आश्रमाकडे जाणारा हा रस्ता साधेपणा जोपासणारा, अल्प खर्चाचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारा असावा, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.

वृक्ष बचाओ नागरिक समितीच्या अभियंता चमूने नवनिर्माणाधीन रस्त्याचा सखोल अभ्यास करून सुधारणा सुचविणारा एक अहवाल सादर केला आहे. या अहवालाचा संदर्भ देत रस्त्याची रुंदी १० मीटर ठेऊन या मार्गावरील कापल्या जाणाऱ्या ६९ वृक्षांसह रस्त्यालगतची तब्बल २३५ झाडे वाचविण्याचा पर्याय या निवेदनातून गांधीजनांनी दिला आहे. केवळ सेवाग्राम व वर्ध्यातीलच नव्हे तर देशभरातील वृक्षतोड थांबवून गांधींच्या तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करावा, अशी हाक देशातील ज्येष्ठ गांधीविचारकांनी दिली आहे.

या गांधी विचारकांचा पुढाकारगांधी स्मारक निधीचे केंद्रीय अध्यक्ष रामचंद्र राही, राधा भट्ट (दिल्ली), के.एम.नटराजन (तामिळनाडू), संतोष गोइदी, गुजरात विद्यापीठातील विचारक दिना पटेल (अहमदाबाद), कुमार शुभमूर्ती (बिहार), धिरुभाई मेहता (मुंबई), सर्वोदय मंडळाच्या आशा बोथरा (राजस्थान), पर्यावरणतज्ज्ञ जया मित्रा (पश्चिम बंगाल), राष्ट्रीय गांधी संग्रहालयाचे ए. अन्नामलाई, राष्ट्रीय युवा संघटनचे कुमार प्रशांत, विश्वजीत रॉय (दिल्ली), के. जी. जगदीशन (केरळ), सोपान जोशी, शोभा सुपेकर (पुणे), सोशल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डी.एम. दिवाकर, प्रा. ए. एन. सिन्हा (पाटणा), नयन भंडारी शर्मा (आसाम), सर्व सेवा संघाचे अमरनाथ भाई (वाराणशी), डॉ. वर्षा दास, जी. बी. शिवराजू (बंगलोर) यांच्यावतीने गांधी स्मारक निधीचे केंद्रीय सचिव संजय सिन्हा यांनी वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम