शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली

By admin | Updated: June 1, 2016 02:35 IST

नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली.

वाहक ठार : ५० प्रवासी जखमी सेलू : नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली. यात ट्रॅव्हल्सखाली दबून वाहक ठार झाल्याची माहिती आहे. तर सुमारे ५० ते ६० प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात हलविले. हा अपघात सोमवारी रात्री धडला. ठार झालेल्या वाहकाचे नाव अ‍ैनूर पठाण रा. धपकी असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.३२ क्यू २४० ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून प्रवासी घेऊन वर्ध्याकडे येण्यास निघाली. सुमारे ९ वाजताच्या सुमारास केळझर येथे पोहोचली. दरम्यान, केळझरनजीकच्या टोलनाक्याजवळील गतिरोधक ट्रॅव्हल्स चालकाला दिसले नसल्याने गतिरोधकाहून ट्रॅव्हल्स उसळली आणि रस्त्यावरच उलटली. ट्रॅव्हल्समधील वाहक दरवाजावर उभा होता. त्याचा दबून मृत्यू झाला. सर्वच आरडा ओरडा सुरू झाली. वाचवा वाचवा म्हणून हंबरडे फोडू लागले. अचानक ट्रॅव्हल्स उलटल्याने प्रवासी दबले गेले. यामध्ये ट्रॅव्हल्सचा वाहक अ‍ैनूर पठाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातस्थळी क्रेनला पाचावरण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने उलटलेल्या ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात पाठविले. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अपघातस्थळी केळझरचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव नरड, बबन वरडकर, गणेश तडस, डॉ. इरशाद शेख, इमरान शेख, ईशाद शेख, अ‍ैफाद शेख यांनी जखमींना बाहरे काढण्यात मदत केली.(तालुका प्रतिनिधी)