शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सची टँकरला जबर धडक, एक ठार; बरबटी गावाजवळ भीषण अपघात

By चैतन्य जोशी | Updated: August 20, 2023 15:23 IST

वर्धा : चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सचा समोरील टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाला. अपघातात एक जण ठार ...

वर्धा : चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सचा समोरील टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाला. अपघातात एक जण ठार झाला तर आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बरबटी गावानजीक झाला. 

धीरज कुळकर्णी (४८) रा. बल्लापूर असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गंभीर जखमी असलेल्या चार ते पाच प्रवाशांवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

अपघाताची माहिती मिळताच जाम पोलिस मदत केंद्र आणि सिंदी रेल्वे पोलिसांनी नोंद घेत जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर काही किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार केले. 

एम.एच. ३४बी.झेड. ०००९ क्रमांकाची महाराजा ट्रॅव्हल्स चंद्रपूर येथून नागपूरकडे जात होती. दरम्यान समोर जात असलेल्या एम.एच. ०४ एफयू. २०४५ क्रमांकाच्या टँकरला ओव्हरटेक करत असताना चालकाने निष्काळजीपणे ट्रॅव्हल्स चालवून टँकरला मागाहून भीषण धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू तर दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Accidentअपघात