लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ठाणेदारांपैकी पाच जणांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांची विनंती वरिष्ठांनी मान्य केली असून विनंतीत असलेल्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. तर एका ठाणेदाराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.विनंती बदल्यात सध्या हिंगणघाट ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिरतोडे यांची बदली लोहमार्ग मुंबई येथे करण्यात आली. वर्धेतील दीपक सुखदेव साखरे यांना नागपूर शहर येथे पाठविण्यात आले. रामनगर ठाण्याचे निरीक्षक विजय मगर यांना अकोला येथे पाठविण्यात आले. तर आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांना सोलापूर ग्रामीण येथे बदली देण्यात आली. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांना नागपूर शहर येथे रवाना करण्यात आले.कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांत राजू बन्सी मेंढे यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली. जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण करणारा हा एकमेव अधिकारी असल्याचे जाहीर झालेल्या याद्यांमधून दिसून आले तर अकोला येथील प्रल्हाद किसनराव काटकर हे वर्धा पोलीस विभागात बदलून आले आहे. सोबतच नागपूर शहरचे सत्यवीर कुमार मारोतराव बंडीवार वर्धा पोलीस विभागात रूजू झाले आहे. जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून केवळ दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहे. यामुळे ठाणेदारांच्या रिक्त पदांचा अतिरिक्त भार जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खाद्यांवरच येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेत बदल्याचा फटकाजिल्ह्यात पोलीस विभागात पहिलेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे अनेकवेळा पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. यात एकाच वेळी पाच ठाणेदारांच्या विनंती बदल्या झाल्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे. शिवाय जिल्ह्यात नवे अधिकारीही आले नसल्याने कामांचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तत्काळ मुक्त करण्याचे आदेशबदली झालेल्या अधिकाºयांना दिलेल्या ठिकाणी तत्काळ रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेश आहेत. बदली झालेल्या कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदली झालेल्या जागेवर रूजू होण्याचे फर्मानही सोडण्यात आले आहे.काही भागात विधान परिषदेची निवडणूक असल्याचे आदर्श आचारसंहिता आहे. यामुळे संबंधीत जिल्ह्याच्या घटक प्रमुखाने त्याबाबत संबंधीत निवडणूक अधिकाºयांशी संपर्क साधून आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची काळजीपुर्वक दक्षता घ्यावी व संबंधीत नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांना बदली ठिकाणी कार्यमुक्त करावे व तसा अहवाल वरिष्ठांना पाठवावा असे आदेशित केले आहे.
सहा ठाणेदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:40 IST
जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ठाणेदारांपैकी पाच जणांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांची विनंती वरिष्ठांनी मान्य केली असून विनंतीत असलेल्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे.
सहा ठाणेदारांच्या बदल्या
ठळक मुद्देपाच जणांची विनंती तर एकाचा झाला होता कार्यकाळ पूर्ण