शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सागरच्या अपघाती मृत्यूने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:10 IST

बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही.

ठळक मुद्देचुली पेटल्या नाही : मनमिसाळू स्वभावाचा व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद)/ कारंजा (घाडगे): बोरगाव (टुमणी) येथील सागर पुरूषोत्तम ढोले (२६) याचा नागपूरवरून बोरगाव (टुमणी)कडे येत असताना ठाणेगाव नजीकच्या बोरीफाटा जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावात शोककळा पसरली असून आज गावात चुली पेटल्या नाही.सदर अपघातात सागरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. मंगळवारी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर पंचायत समितीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. नोकरी करताना सर्वांशी आपुलकीचे संबंध त्याने जोपासले होते.सोमवारी सागर हा नागपूरला काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी नागपूरवरून परत येताना कारंजा (घा.) तालुक्यातील बोरीफाटा जवळ उभ्या सी.जी.०४ एच.टी. ९९१२ क्रमांकाच्या ट्रकवर एम.एच. ३२ ए.ए.०३५६ क्रमांकाच्या दुचाकी धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की सागरच्या डोक्यातील हेल्मेट अचानक बाजूला फेकल्या गेले अन् त्याच्या डोक्याला जबर मार बसला. गंभीर जखमी अवस्थेतील सागरला परिसरातील नागरिकांनी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले. सागरच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. तो पं.स.चे माजी सभापती मोहन ढोले यांचा पुतण्या होय. सदर अपघाताची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेची कारंजा पोलिसांनी नोंद घेतली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू