अपघात ठळला : वीज वितरणने लक्ष देण्याची गरजसेवाग्राम : येथील मुख्य मार्गावरील एक झाड उन्मळून दुभाजकावर पडले. यावेळी रहदारी नसल्याने अपघात झाला नाही. पण काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील अण्णासागरच्या दिशेकडील एक झाड गुरुवारी सकाळला ८ वाजताच्या कोसळले. झाड मोठे असल्याने आणि दुभाजकावर पडल्याने वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती. यावेळी कोणतेही वाहन ये जा करीत नसल्याने दुर्घटना ठळली. सेवाग्राम मार्ग आणि दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्यात आला आहे. पादचारी भागावर मोठ्या प्रमाणात मोठी झाडे आहेत. याच बाजूने वीज प्रवाहाच्या तारा असून पडलेले झाड अण्णासागर तलावाच्या दिशेने पडले असते. सदर झाड वीज तारांवर पडले असते तर वीजप्रवाह खंडीत झाला असता. तसेच मोठा अनर्थ होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. झाडांच्या फांद्या रस्त्यापर्यंत आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वीज वितरण कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: July 9, 2016 02:21 IST