शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’ संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात   टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंजेक्शनची मागणी करणाऱ्याला पुरवठा करण्यात आला; पण सध्या हे महागडे इंजेक्शन जिल्हा सामान्य रुग्णालयातच नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देगरजूंना बाजारपेठेत किमान ३९ हजार रुपये मोजावी लागतेय किंमत

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अति गंभीर कोविड बाधितांसाठी नवसंजीवणी ठरणाऱ्या ‘टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन’चा जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठा संपल्याने गरीब व गरजूंना हे इंजेक्शन बाजारपेठेतून खरेदी करण्याची वेळ ओढवणार आहे. या इंजेक्शनचा एक वायल किमान ३९ हजार रुपये किमतीचा असून, हे औषध जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात   टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंजेक्शनची मागणी करणाऱ्याला पुरवठा करण्यात आला; पण सध्या हे महागडे इंजेक्शन जिल्हा सामान्य रुग्णालयातच नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. इतकेच नव्हे तर या औषधाची खरेदी करण्यासह शासनाकडे मागणी नोंदविण्याकडेही टाळले जात असल्याने गरजू आणि गरीब कोविड बाधिताला मोठा आर्थिक फटका सहन करून हे औषध रुग्णालयाबाहेरून खरेदी करण्याची वेळ ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फुफ्फुसावरील सुज कमी करण्यासाठी उपयुक्तएखाद्या गंभीर रुग्णाच्या फुफ्फुसावरील सुज वेळीच कमी न झाल्यास त्या रुग्णाचा तडकाफडकी मृत्यू होतो. असेच मृत्यू रोखण्यासाठी टॉक्सिलीझुमॅब इंजेक्शन उपयुक्त ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

२७ हजार ५०० फेविपीरव्हिर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाला ३६ हजार ४० इतक्या फेविपीरव्हिर या औषधाचा पुरवठा करण्यात आला हाेता. तर सध्या २७ हजार ५०० फेविपीरव्हिरचा साठा जिल्हा रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले.

रेमडेसिविर इंजेक्शन केवळ ७४० गंभीर कोविड बाधिताचा रुग्णालयातील मुक्कामाचे दिवस कमी करण्यासाठी रेमडेसिविर हा अखेरचा उपाय नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञ सांगत असले तरी गंभीर कोविड बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिविर या औषधाची मागणीही वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात ७४० रेमडेसिविर इंजेक्शन असून, ते गरजू रुग्णाला दिले जात आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल