शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:01 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

ठळक मुद्देआर्वीची देवयानी डहाके व वर्ध्याची राधिका राठी द्वितीय स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.ओम झाडे हा आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी आहे. तर याच हायस्कूलमधील देवयानी कुंभराज डहाके आणि वर्धा शहराशेजारी असलेल्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलच्या राधिका सुनील राठी या दोन्ही विद्यार्थिनींनी ९७.८० टक्के असे समान गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे. तर जिल्ह्यात तृतीयस्थानी महक अवतारसिंग गुरूनासिंघानी ही विद्यार्थिनी राहिली. ती विद्या निकेतन इंग्लिश हायस्कूल आर्वी येथील विद्यार्थिनी असून तिने ९७.६० टक्के गुण घेतले आहे. वर्धा जिल्ह्याचा निकाल यंदा ६५.०५ टक्के लागला आहे. वर्धा जिल्ह्यातील २८३ शाळांमधून एकूण १७ हजार २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केला होता. त्यानंतर त्यापैकी १६ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादित केले आहे.‘ओम’ला व्हायचंय केमिकल इंजिनिअरदहावीच्या परीक्षेत ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावणाºया ओम झाडे याला केमिकल इंजिनिअर व्हायचे आहे. रसायनशास्त्राची विशेष आवड असलेला ओम नियमित चार तास अभ्यास करायचा. ओमचे वडील रवींद्र झाडे हे शिक्षक असून ते विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवितात. उत्कृष्ट चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी परिसरात ओळख आहे. तर ओमची आई संध्या या गृहिणी आहेत. ओम याला चित्रकला व क्रिकेट यात विशेष रूची आहे.आठही तालुक्यात वर्धा अव्वलजिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास वर्धा तालुका हा दहावीचा उत्कृष्ट निकाल देण्यात अव्वल राहिला आहे. वर्धा तालुक्यातील ४ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ३ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्याने वर्धा तालुक्याचा टक्का ७१.८८ इतका राहिला. तर देवळी तालुक्यात २ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा देत १ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याने देवळी तालुक्याचा टक्का ६४.३२ राहिला. सेलू तालुक्याचा निकाल ५७.३० टक्के लागला. या तालुक्यातून १ हजार ५६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. तसेच आर्वी तालुक्यातील १ हजार ९०४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. परिणामी, आर्वी तालुक्याचा निकाल ६२.७१ टक्के राहिला. आष्टी तालुक्यातील ८२९ विद्यार्थ्यांपैकी ५०० विद्यार्थ्यांनी यश संपादित केल्याने आष्टी तालक्याचा निकाल ६०.३१ टक्के राहिला. तर कारंजा तालुक्याचा निकाल ६७.६१ टक्के लागला. या तालुक्यातून १ हजार १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. हिंगणघाट तालुक्याचा निकाल ६६.४० टक्के लागला. या तालुक्यातून ३ हजार २१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार १३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. तसेच समुद्रपूर तालुक्यातील १ हजार २५८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. त्यामुळे समुद्रपूर तालुक्याचा निकाल ५३.६५ टक्के राहिला.तीन शाळांना भोपळावर्धा जिल्ह्यातील २४ शाळांनी १०० टक्के निकाल देऊन यशाची परंपरा कायम राखली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यातीलच तीन शाळांमधील एकही विद्यार्थी पार होऊ शकला नसल्याचे वास्तव निकालानंतर पुढे आले आहे. यात आर. के. कुरेशी उर्दू हायस्कूल आर्वी, नगर परिषद हायस्कूल पुलगाव आणि हिंगणघाट येथील भारत दिनांत हायस्कूलचा समावेश आहे.राधिकाला डॉक्टर व्हायचंयदहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण घेत घवघवीत यश संपादित करणाºया राधिका सुनील राठी हिला डॉक्टर व्हायचे आहे. ती सध्या नीटच्या परीक्षेची तयारी करीत आहे. राधिकाचे वडील सुनील राठी हे देवळी येथील एसएसएनजे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहे. राधिकाच्या मोठ्या बहिणीने बीटेक केले आहे. आई-वडिलांसह तिचे राधिकाला मार्गदर्शन लाभते. राधिकाला गायनासह चित्रकलेचा छंद आहे. विशेष म्हणजे, राधिका ही वर्ग आठवीचे शिक्षण घेत असताना तीने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले होते.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल