लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारे जन्मजात असलेले व्यंग, आजार यावर वेळीच उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातात. यातच ज्या मुलांना बोलण्याचा त्रास होतो. अशा बालकांवर 'टंग टाय' शस्त्रक्रिया केली जाते. जिल्ह्यात दोन बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शाळा व अंगणवाडी आरोग्य तपासणीदरम्यान आढळलेल्या बालकांना ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर संदर्भित करण्यात येते. ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. त्यांना वरिष्ठ स्तरावर संदर्भसेवा पुरविण्यात येते. जीभव्यवस्थित हालचाल करू शकत नसल्यामुळे शब्द उच्चारण्यात किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते. सर्जरी केल्यानंतर स्पीच थेरपीने बालकांची बोलण्याची अडचण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक बालकांना दिलासा मिळू शकतो.
शस्त्रक्रीयेसाठी अशी झाली बालकांची निवडज्यां बालकाची जीभ सामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असते, ज्यामुळे जीभपूर्णपणे हालचाल करू शकत नाही. अशा बालकांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड केली जाते. त्यातील दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पूर्णतः मोफत उपचारआरबीएसकेअंतर्गत बालकांवरील उपचार, तसेच गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. बहुतांश शस्त्रक्रिया या खासगी रुग्णालयात केल्या जातात.
उच्चाराची समस्या, ऋषिकेशला 'लुषिकेश'!जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा (फ्रेन्युलम) असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असल्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे उच्चारणातही अडचणी येतात.
शस्त्रक्रिया कुठे?जिल्ह्यात टंगटाय ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी ही शस्त्रक्रीया करण्यात येते.
शून्य ते १८ वयोगटातील मुलांची तपासणीराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी करून मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याकरिता अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयात तपासणी मोहीम राबविण्यात येते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देशराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात व्यंग, लहान मुलांमधील आजार असणाऱ्यांना वेळीच उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
टंग टाय म्हणजे काय?जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असणे, ज्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे बोलण्यावरही परिणाम होऊ शकतो.
"० ते १८ वयोगटातील बालकांच्या गंभीर आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाते. जिल्ह्यात टंगटाय शस्त्रक्रियेसाठी बालकांची निवड करण्यात आली असून, दोन बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे."-डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा