शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बोर अभयारण्यात वाघांचा संचार वाढला; चार नव्या वाघांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:15 IST

Wardha : एकूण वाघांची संख्या पोहोचली १९ वर, अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोर वन्यजीव अभयारण्य हे देशातील सर्वांत लहान व्याघ्र प्रकल्प अशी ओळख आहे. ८१६ चौ. किमी पसरलेल्या या अभयारण्यात वाघांना पोषक वातावरण उपलब्ध झाल्याने वाघांची संख्या वाढली आहे. नुकत्याच झालेल्या वाघांच्या प्रगणनेत चार वाघांची भर पडली असून, ही संख्या १९ वर गेल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

बोर व्याघ्र अभयारण्य हे त्याच्या विपुल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, तसेच वाघांसह विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिवास आहे. नुकतेच या व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण झाल्याने कोअर क्षेत्राचा ताबा वन्यजीव विभागाला देण्यात आला आहे. यंदा मार्च ते एप्रिल महिन्यात या बोर व्याघ्र प्रकल्पात वाघांची प्रगणना करण्यात आली. गणनेसाठी ट्रॅप कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. याच चित्रीकरणाच्या सूक्ष्म अवलोकनात चार नवीन वाघांची नोंद घेण्यात आली आहे यात बांगडापर हिंगणी कवडस न्यू बोर, ओल्ड बोर या ठिकाणी या चार वाघांचा मुक्त संचार असल्याचे आढळून आले आहे. 

वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशन डेहराडून येथील तज्ज्ञांच्या चमूने अवलोकन करून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल बोर व्याघ्र प्रकल्पाला येत्या पंधरवयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर वाघांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होणार आहे. वाघांच्या अधिवासाचा वाढता आलेख बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षक ठरणार असून याचा पर्यटनाला मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे

बंगाल वाघ मुख्य आकर्षण

  • राखीव हे बंगाल वाघ, भारतीय बिबट्या, सांबर, चितळ, माकड आणि भारतीय बायसन यासारख्या सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजातींचे घर आहे.
  • बेंगाल टायगर्स हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. २०१४ पूर्वी बोर अभयारण्य आणि त्याच्या परिसरात फक्त सहा ते सात वाघांची संख्या होती. वाघांना पोषक वातावरण मिळाल्याने या ठिकाणी ही संख्या सध्या १९ वाघांपर्यंत पोहोचली आहे.

३९६ ट्रॅप कॅमेऱ्यांची झाली मदत१३८ चौरस किमीचे बफर क्षेत्र, तर ६७४ चौरस किमीच्या कोअर क्षेत्रात वाघांच्या हालचालींची नोंद घेण्यासाठी ३९६ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. महिनाभर हाचलालींचे निरीक्षण केल्यानंतर ४ नव्या वाघांची नोंद यात घेण्यात आली आहे.

पूर्वी १५ वाघांची होती नोंदगतवर्षी झालेल्या प्रगणनेत बोर व्याघ्र प्रकल्पात ९ मोठे, तर ६ किशोर वाघांची नोंद घेण्यात आली होती. यात चार वाघांची भर पडली असून, दोन नर, तर दोन मादी वाघांचा समावेश असल्याचे निरीक्षणात पुढे आले आहे. यांचे टी-१६, टी-१७, टी-१८, टी-१९, असे नामकरण ठेवण्यात आले आहे.

"मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या वाघांच्या प्रगणनेचे चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रिकरण वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशनकडे सूक्ष्म निरीक्षणासाठी पाठिवण्यात आले आहे. दरम्यान चार नव्या वाघांची नोंद घेण्यात आल्याचे निरीक्षणात पुढे आले आहे. मात्र, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी वाघांची संख्या किती? हे कळणार आहे. आठ-पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार आहे."-मंगेश ठेंगडी, उपवन संरक्षक, (प्रादेशिक), वन विभाग, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धाTigerवाघwildlifeवन्यजीव