शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीनचाकी मालवाहूची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:34 IST

घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या तीन चाकी मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. किशोर बिजाराम देवतळे रा. खांबाडा जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देएक ठार : राष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या तीन चाकी मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. किशोर बिजाराम देवतळे रा. खांबाडा जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.किशोर देवतळे हा हिंगणघाट येथील येनोरा मार्गावरील बजाज दालमीलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होते. काल सुट्टी असल्याने ते सासरवाडी असलेल्या हळदगाव येथे गेले होते. तेथून आज ते एम.एच. ३१ ए.व्ही. ५८५४ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत असताना हा अपघात झाला. सदर दुचाकी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आली असता विरुद्ध दिशेने गॅस सिलिंडर घेऊन येणाºया एम.एच. ३२ क्यू. ५७७८ क्रमांकाच्या मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात किशोर देवतळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटेनची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली असून मृतक किशोरच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.आरोपी मालवाहू चालक पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणातील आरोपी मालवाहू चालक किशोर आंनद धोटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील चार दिवसात तीन अपघात झाले असून यात दोघांचा प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे भरधाव वाहनांच्या गतीला आवर घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह वाहतूक पोलिसांची तेथे नियुक्ती करणे गरजेचे आहे.दुचाकी अपघातात दोन ठारकारजा (घा.) - बांगडापूरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झाला. रामभाऊ मारोती धाडसे (५०) व विवेक लक्ष्मण करनाके (४०), असे मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३२ एफ. ७२३१ क्रमांकाच्या दुचाकीने विवेक आणि रामभाऊ हे दोघे सावरगाव येथून बांगडापूरच्या दिशेने जात होते. दुचाकी धर्ती शिवारातील पुलाजवळ आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान वाहन पुलाच्या सुरक्षा कठड्यांवर जावून धडकले. या अपघातात रामभाऊ याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या विवेकला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात