शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार वर्षांचा इतिहास शिळावर्तुळाखाली दफन; संशोधनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:17 IST

संशोधनाची गरज : खैरवाडा पर्यटन केंद्राची २० वर्षांपासून मागणी, पूर्तता कधी?

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. या काळाला लोह-बृहदाश्मयुग हे नाव संबोधले जाते. या संस्कृतीचे विपुल पुरावे नजीकच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील खैरवाडा गावात आढळून आले आहे. येथे आढळून येणारे शिळावर्तुळ हे हजारो वर्षापूर्वीचे असल्याने या ठिकाणी खैरवाडा पर्यटन केंद्राची मागणी सातत्याने केली. मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

खैरवाडा गावचे संशोधन सर्वप्रथम १८८१ मध्ये डॉ. जे कॅरन यांनी केले. १९८१ साली डेक्कन कॉलेज पुणेच्या पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी सर्वेक्षण केले होते. त्यात पंधराशे शिलावर्तुळे आढळून आली होती. ही शिळावर्तुळे लोहबृदाश्मयुगातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या संस्कृतीचा काळ इ.स.पू. १००० पासून इ.स.पू. ७००-८०० पर्यंतचा असून, कर्नाटकातील कुमरणहळळी येथे इ.स.पू. १३०० मध्ये या संस्कृतीची सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. 

या संस्कृतीची दफनाची एक विशिष्ट पद्धत होती. यात साधारणपणे तीन प्रकारचे दफन करण्यात येत होते. संपूर्ण शरीराचे दफन, अग्निसंस्कारानंतर हाडे संग्रहित करून त्यांचे दफन, पारशी लोकांच्या पद्धतीसारखे पशूनी खाल्ल्यावर अस्थिसांगाड्याचे दफन. दफनाकरिता साधारणपणे एक खड्डा खणून त्यात शव किंवा सांगाडा किंवा अस्थिअवशेष व त्याने वापरलेल्या वस्तू, नंतरच्या जीवनात उपयोगी पडू शकणाऱ्या वस्तू व मृताच्या प्रिय वस्तू यांचे दफन करून खड्डा मातीने बुजवून त्याच्या सभोवती वर्तुळाकार मोठमोठे दगड ठेवण्यात येत असत. खैरवाडा परिसरात आजही ही शिलावर्तुळे सुस्थितीत असून, काही शेतीमुळे सपाट करण्यात आली आहेत. 

शिलावर्तुळाचे विविध आकार उपलब्ध शिलावर्तुळाचे मोजमाप केले असता शिलावर्तुळाचा व्यास ३० फूट, ४० फूट, व ५० फूट आढळून आला. ही १० फुटांच्या प्रमाणात असलेली शिलावर्तुळे वैशिष्ट्यपूर्णच आहे. उंची ३ ते ५ फूट उंच आहे. शिलावर्तुळाचा व्यास याच्या संबंधाच्या संशोधनाची गरज आहे. प्रत्येक शिलावर्तुळात ४० पाषाण खंड आहेत. वनखात्याच्या जमिनीवरील शिलावर्तुळे आजही सुस्थितीत आहेत. काही पाषाण खंड ५-६ फूट उंचीचे असून, काही पंचकोन व षटकोणी स्तंभाच्या आकाराचे आहेत.

पर्यटन केंद्रासाठी आमदारांकडे साकडे तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले खैरवाडा (ता. कारंजा) गावाला पर्यटन केंद्र म्हणून घोषित करावे. या ठिकाणी पुरातत्त्व संग्रहालय स्थापन करण्यात यावी अशी मागणी विदर्भ पर्यटन व पर्यावरण संस्था रोहणाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून शासनाकडे केल्या जात आहे. मात्र, अद्याप याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे याचा पाठपुरावा करून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ही मागणी मान्य करून घ्यावी यासाठी आमदार सुमित वानखडे यांना साकडे घालण्यात आले.

टॅग्स :wardha-acवर्धा