शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

दोन अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:34 IST

जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत.

ठळक मुद्देआजंती शिवार व पवनार येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/हिंगणघाट : जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत.जाम येथे स्कार्पिओ वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात युवक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर आजंती शिवारातील मोठा हनुमान मंदिराजवळ घडली. रक्षेश महेश पटेल (२०) रा. जाम, असे जखमी युवकाचे नाव आहे. तो स्कार्पिओ क्र. एमएच १५ बीडी ९८७९ ने जाम येथून हिंगणघाटच्या दिशेने एकटाच येत होता. दरम्यान, अचानक वाहनाचा समोरील टायर फुटल्याने चालक रक्षेश याचे नियंत्रण सुटून वाहन चार पलट्या घेत दुभाजक ओलांडून जामकडे जाणाऱ्या मार्गावर एका कडेला जाऊन आदळले. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत रक्षेश पटेल याला गाडीतून बाहेर काढून उपचारार्थ प्रथम हिंगणघाट येथील खासगी रुग्णालयात भरती व नंतर नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. रक्षेश पटेल हा जाम येथील संतराम हॉटेलचे मालक महेश पटेल यांचा मुलगा आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.शिवशाहीची टिप्परला धडकपवनार - यवतमाळ आगाराच्यास एमएच ०९ इएम १४६७ क्रमांकाच्या शिवशाही बसने टिप्परला मागाहून धडक दिली. हा अपघात शनिवारी पवनार नजीक घडला. यात बसमधील वीणा पाहुणे (६५) यांच्या दाताला मार लागला तर चालक सलीम शेख (४५) हे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये २३ प्रवासी होते. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. टिप्परने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बस अनियंत्रित झाली व टिप्परवर आदळली. अपघातानंतर टिप्पर पसार झाला. अपघातात शिवशाहीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

टॅग्स :AccidentअपघातShivshahiशिवशाही