शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

गोवर्धनच्या मारेकऱ्यांना तीन दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:09 IST

रानडुक्कराची शिकार करताना बंदूकीतून निघालेली गोळी थेट शेतकºयाला लागली. यात परतोडा येथील शेतकरी गोवर्धन डोबले याचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : रानडुक्कराची शिकार करताना बंदूकीतून निघालेली गोळी थेट शेतकºयाला लागली. यात परतोडा येथील शेतकरी गोवर्धन डोबले याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी लिडरसिंग चरणसिंग बावरी (४४), अनुपसिंग अचलसिंग बावरी (३५) व अशोकसिंग अमरसिंग बावरी (४४) यांना तळेगाव येथील शिख बेड्यावरून अटक करून त्यांची तीन दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे.इंग्रजकालीन बनावटीच्या भरमार बंदुकीचा वापर करून परतोडा शिवारात रानडुक्कराची शिकार केली जात होती. रानडुक्कराची शिकार करताना थेट शेतकरीच गतप्राण झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी संतप्त जमावाने पूर्वी आरोपींना जेरबंद करा तेव्हाच मृतदेहाला हात लावू देऊ असा पवित्रा घेतला होता. संतप्त जमावाच्या भावना लक्षात घेवून तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आपल्या हालचालींना गती देत आरोपी लिडरसिंग चरणसिंग बावरी (४४), अनुपसिंग अचलसिंग बावरी (३५) व अशोकसिंग अमरसिंग बावरी (४४) यांना शनिवारी रात्री तळेगाव (श्या.पं.) येथील शिख बेड्यावरून ताब्यात घेतले. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तज्ज्ञांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यासाठी रविवारी मृतक गोवर्धन डोबले याचा मृतदेह आर्वी येथील शासकीय रुग्णालयातून पोलिसांच्या बंदोबस्तात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आला. तेथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांच्या चमूद्वारे गोवर्धनचे शवविच्छेदन करण्यात आले. तर अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून तिनही आरोपींची तीन दिवसीय पोलीस कोठडी तळेगाव पोलिसांनी मिळविली आहे. पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक पोलीस जप्त करणार आहे.

टॅग्स :Murderखून