शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाला धमकी; सदस्य एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:03 IST

शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाच्या कामाबाबत ग्रामपंचायत पिपरी (मेघे) कडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या.

ठळक मुद्देशिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाचा वाद : कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाच्या कामाबाबत ग्रामपंचायत पिपरी (मेघे) कडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. त्यामुळे सरपंच अजय गौळकर हे ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह कामाची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा सदोष काम आढळून आल्याने काम बंद करायला लावले. यामुळे संतापलेल्या कंत्राटदाराने लगेच संरपचासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्कसाधून धमकी दिली. याप्रकरणी सरपंचाच्या तक्रारीवरुन कंत्राटदार माया तिवारी यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाचा कंत्राट जे.पी.कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यामुळे सरपंच गौळकर हे ग्सदस्यांसह रस्त्यावर गेले. सरपंचाने उपअभियंता मंत्री यांना बोलविले असता त्यांनी उपस्थित नसल्याचे सांगितल्याने शाखा अभियंता हातमोडे यांना बोलावून कामाची पाहणी केली.त्यावेळी या कामात अनेक त्रुट्या आढळून आल्या. याबाबत शाखा अभियंता हातमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले. त्यामुळे उपअभियंता मंत्री यांना भ्रमध्वनीवर संपर्क साधून विचापूस केली असता त्यांनी काम बंद करतो आणि मी स्वत: येऊन चौकशी करतो असे आश्वासन दिले. काम बंद केल्याने संतापलेला कंत्राटदार माया तिवारी याने भ्रमणध्वनीवरुन धमकी दिली. असे सरपंचाने तक्रारीत नमुद केले आहे. रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन कं त्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामसभा घेतली. त्यानंतर सर्व सदस्यांनी आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले.यावेळी सरपंच गौळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, सदस्य सिमा दोडके,भारती गाडेकर, पंकज उजवणे, दीपमाला राजुरकर, प्रशांत खंडारे, मनीष मसराम, दिक्षा जीवने, ज्योती वाघाडे, नलिनी परचाकी, शुभांगी पोहाणे, गजानन वानखेडे, वैभव चाफले,कुमूद लाजुरकर, सुधीर वसू, विद्या कळसाईत व सुरेंद्र झाडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत