शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आश्रमात जपले जातेय विचार आणि वास्तूचेही पावित्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:14 AM

जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देबापूंचा दहा वर्षे मुक्काम : सेवाग्राममधून मिळते परिवर्तनाचे बळ

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींनी हिंसेला कधीच थारा दिला नाही. देशाला नव्हे तर जगाला परिवर्तनाचे बळ देणाºया बापुंची हत्या करण्यात आली. पण, आजही ७१ वर्षानंतर त्यांचे विचार प्रेरणादायी ठरत असल्याने माणूस गेल्या नंतरही विचार रुपाने तो कायम असतो, हे सिद्ध झाले आहे. बापूंनी सेवाग्रामच्या आश्रमात आयुष्याचे दहा वर्षे घालविली असून त्यांची हे दहा वर्षे वर्ध्यांच्या इतिहासात कोरल्या गेली आहे. त्यामुळे आजही बापूंचे विचार आणि आश्रमातील वास्तुंचे पावित्र्य जपल्या जात आहे.महात्मा गांधींच्या सार्वजनिक व आश्रमीक जीवनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आणि टाँलस्टाँय फार्म पासून झाली. येथूनच बापूंच्या विचार व कार्याला सुरूवात झाली असून ते खºया अर्थाने दक्षिण आॅफ्रीकेतच घडले. भारतातील कार्याने त्यांची वैचारीक प्रगल्भता आणखीच वाढत गेली. जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव महात्मा गांधी २३ सप्टेंबर १९३४ मध्ये वर्ध्यात आले. हरितसेनेचे व्रत घेतलेल्या मीराबेन यांच्या कार्याने प्रभावित होऊन ‘खेड्याकडे चला’ चा नारा देत बापूंनी १३ एप्रील १९३६ ला सेवाग्राम गाठले. सेवाग्रामातील बजाज यांच्या शेतात कुटी करुन वास्तव्याला सुरुवात केली. कालांतराने आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, आखिरी निवास, परचुरे कुटी यातून विचारांचे बिजारोपण होत आश्रम तयार झाला. येथून देश व स्वातंत्र्याच्या लढ्याची रणनीती आखण्यात आली. त्यामुळे सेवाग्राम आश्रम हा बापूंचे निवासस्थानच नाही तर देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरला. येथे १९३४ पासून १९४६ पर्यंत बापूंचे वास्तव्य राहिले आहे. या दहा वर्षाच्या काळात रचनात्मक कार्यक्रम राबवित स्वातंत्र्य लढ्याकरिता कार्यकर्ते घडविण्याचे कार्य केले. त्यांनी एकादश व्रताचे स्वत: पालन करुन इतरांनाही सांगितले. आश्रमीय जीवन पद्धतीचा नियमच गांधीजींनी सर्वांना घालून दिला. जगाला नवविचार देणाºया या महात्म्याची ३० जानेवारी १९४८ मध्ये हत्या करण्यात आली. त्यांना जाऊन आज ७१ वर्षे झाली; पण आश्रमात त्यांनी बिजारोपण केलेल्या विचारांची फळे आता नवपिढी चाखताना दिसत आहे. जीवनाला नवा आयाम देण्यासाठी बापूंचे विचार महत्त्वाचे असल्याने आश्रमात पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.आश्रमातील कार्यपद्धतीची परंपरा कायमचगांधीजींनी सांगितलेली व्यवस्था व कार्यपद्धती आजही आश्रमात कायम आहे. स्वच्छता व शांतता हा आश्रमाचा आत्मा आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या आश्रमात झाडांनी आणखीच भर घातली आहे. येथील कुट्यां कालौघात दुरुस्ती करण्याची वेळ आली; पण मुख्य उद्देशाला धक्का न लावला कुट्यांच्या भिंती आणि छताचीही दुरुस्ती करण्यात आली. तसेच या आश्रमात सेंद्रीय शेती, गो-शाळा, सुतकताई, विनाई, ग्रामोद्योग उत्तम पद्धतीने सुरु आहे. परिसरातील बेलाचे झाड उद्योगासाठी हातभार लावत आहे तर गोशाळेमुळे शेतातील उत्पानात वाढ झाली आहे.आधुनिक काळातील जीवनमान आणि न संपणारी पागल दौड, यातून विभक्तिकरण आणि नीती मूल्यांचा ºहास झाला आहे. चंगळवाद उफाळून दु:खाला आमंत्रण ठरत आहे. त्यामुळे आपले जीवन कसे असावे? याचा शोध घेण्यासाठी लाखो पर्यटक व अभ्यासक आश्रमाला भेटी देतात.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी