शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गंभीर दुखापत करणाऱ्या पतीस दहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी हा वर्धा शहराशेजारील सावंगी (मेघे) भागातील समतानगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायाधीश आदोने यांनी भादंविच्या कलम ३२५ (अ) अन्वये दहा वर्षांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ (२) नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा न्याय निर्वाळा करताना न्यायाधीशांनी फौजदारी कलम ३५७ (१) नुसार पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : आराेपी घ्यायचा पीडितेच्या चारित्र्यावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पीडितेच्या गुप्तांगात इंजेक्शनने ॲसिड टाकून तिला गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपी पतीस जिल्हा न्यायाधीश-२ आर. व्ही. आदोने यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी हा वर्धा शहराशेजारील सावंगी (मेघे) भागातील समतानगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायाधीश आदोने यांनी भादंविच्या कलम ३२५ (अ) अन्वये दहा वर्षांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ (२) नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा न्याय निर्वाळा करताना न्यायाधीशांनी फौजदारी कलम ३५७ (१) नुसार पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे.

महिला अधिकाऱ्यांनी केला तपास- या प्रकरणी पीडितेने सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविताच पोलिसांनी आरेापीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली. सेवाग्राम पोलीस स्टेशनमधील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुषमा सुरेश बिसंदरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. 

आरोपी निर्दयीच- आरोपी याने घटनेच्या दिवशी पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण निर्दयी आरोपीने विकृत मानसिकतेचा कळस गाठत पीडिताच्या गुप्तांगात इंजेक्शनने ॲसिड टाकून तिला गंभीर दुखापत केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनेबाबत कोणाला सांगितले तर जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडितेला दिली.

नऊ साक्षीदारांची तपासली साक्ष- ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात शासकीय बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर गांजरे यांनी सहकार्य केले. या प्रकरणात न्यायालयात एकूण नऊ व्यक्तींची साक्ष तपासण्यात आली.

सरकारी वकीलांचा  युक्तिवाद ठरला मोलाचा

- फिर्यादी तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष तसेच इंजेक्शनमधील वापरण्यात आलेले सल्फरिक ॲसिड व   आरोपीचे दाखविल्यावरून जप्त करण्यात आलेले सल्फरिक ॲसिड हे एकच असल्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. या विषयी न्यायालयात  जिल्हा सरकारी वकील ॲड. गिरीश तकवाले यांनी युक्तिवाद केला. हाच मुद्देसूद युक्तिवाद आरोपीला शिक्षेस पात्र ठरण्यासाठी मोलाचा ठरला.

 

टॅग्स :Courtन्यायालय