लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, सध्या चोरट्यांबाबत हिंगणघाट शहरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रियंका श्रीकांत जीवतोडे (२७) हे कुटुंब न्यू यशवंतनगर मधील राकेश नल्लावार यांच्या घरी किरायाने राहतात. प्रियंका या कुटुंबियांसह तिन दिवसांपूर्वी वडनेर येथे माहेरी गेल्या होत्या. त्या आज परत्यावर आणि त्यांचे कुटुंबीय घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरट्यांनी त्यांच्या घरातून एक मंगळसूत्र, सोन्याचे कानातले व तोरड्या चोरून नेल्या. या प्रकरणी प्रियंका जीवतोडे यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.गुन्ह्यांचा आलेख चढतोय वरमागील तीन दिवसांचा विचार केल्यास हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तोतया पोलिसांनी महिलेजवळील दागिने लंपास केले. ही घटना ताजी असतानाच एका पाठोपाठ एक घरफोड्या झाल्या. तर डांगरी वॉर्डात दारूविक्रेत्याने दारूबंदीसाठी काम करणाऱ्या महिला मंडळाच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे सर्वसामान्य हिंगणघाटकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्याचा गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनीही परिसरातील दारूविक्रीसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची मागणी आहे.दोन दिवसातील पाचवी घटनाहिंगणघाट शहरात मागील दोन दिवसांत घडलेली ही चोरीची पाचवी घटना आहे. चोरटे मनमर्जीने घरफोड्या करीत आहे;पण पोलिसांना अद्यापही त्यांचा कुठलाही सुगावा लागला नसल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:17 IST
शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच
ठळक मुद्देपोलीस करतात तरी काय? संतप्त हिंगणघाटकरांचा सवाल