शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी केला हातसाफ, लहान आर्वी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 18:22 IST

लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे लहान आर्वीसह परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपरिसरात दहशतीचे वातावरण

वर्धा : आष्टी (शहीद) नजीकच्या लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे लहान आर्वीसह परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील पाच हजार रुपये रोख तसेच काही साहित्य चोरून नेले. तर दुसऱ्या चोरीत वाॅर्ड क्रमांक ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल होले यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी व लाकडी कपाटातून १० ग्रॅमची सोन्याची पोथ, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची अंगठी, राणी छाप चांदीचे पैसे तसेच ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल पळवला. अतुल होले हे शिक्षक असून ते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे राहत असल्याने घर कुलूपबंद होते. याच कुलूपबंद घराला चोरट्याने टार्गेट केले.

तिसऱ्या चोरीत चोरटे नारायण घाटोळे यांच्या किराणा दुकानाचे शटरचे तोडून दुकानात शिरले. दरम्यान घाटोळे यांच्या शेजारी राहणारे सुभाष होले हे लघुशंकेसाठी उठल्याने व चोरट्यांना कुणी तरी जागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.

गावात तब्बल तीन ठिकाणी चोरी झाल्याचे सकाळी लक्षात येताच पोलीस पाटील देवानंद पाटील यांनी आष्टी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyचोरी