शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नाल्याला आला अचानक पूर आणि घडले अघटित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:13 PM

वर्धा जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांवर मोठा प्रसंग गुदरला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शेतातले काम संपवून त्या घराकडे निघाल्या होत्या. वाटेत पुलावरून जात असताना असे काही घडले की त्यांनी कल्पनाही केलेली नव्हती. जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांवर मोठा प्रसंग गुदरला.शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास आपली शेतातील कामे आटोपून काही महिला घरी परत यायला निघाल्या. वाटेत पूल लागला. पुलवार फारसे पाणी नव्हते. मात्र पूल ओलांडत असताना एकाएकी नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आणि प्रवाह वेगवान झाला. त्या वेगाने तीन महिला पाण्यात लोटल्या गेल्या. त्यांचा आरडा ओरडा ऐकून जवळपासचे लोक धावले. त्यांना बाहेर काढले व तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दोघींनी आपले प्राण गमावले होते तर तिसरी गंभीर होती. चंद्रकला दिनेश लोटे (४५), बेबी चिंतामण भोयर (४५) अशी मृत महिलांची नावे आहेत तर वशाली बावने (३५) ही महिला गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.या पुलावर लोखंडी कठडे बांधण्याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही. तातडीने या पुलावर कठडे बांधण्यात यावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अतुल बावने यांनी केली आहे.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू