शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाचा वाद नडला; मृतदेह दुचाकीसह विहिरीत फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचला होता त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बाेलाविले. तेथे महेंद्रचा दोराने गळा आवळून त्याची हत्या करीत पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे २ गोफ, आणि रोख रक्कम काढून घेत त्याचा मृतदेह आणि दुचाकी विहिरीत पुरवून पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलिसांना दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह एका शेतातील विहिरीत पुरवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती बुधवार ३१ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उजेडात आली. मृतकाच्या शरीरावरील दागिने चोरुन गळा आवळून हत्या करीत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याच्या घटनेने मात्र, आर्वी शहरात चांगलीच खळबळ उडाली. महेंद्र रामराव शिंगाणे (५९) रा. नेताजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी अक्षय रमेश सतपाळ (२३), शेख शाहरुख शेख रउफ (२८), विनोद दयाराम कुथे (४२), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (२९) सर्व रा. आर्वी यांना मध्यरात्रीच्या सुमारास अटक केल्याची माहिती आहे. मृतक महेंद्र हा कुणालाही न सांगता त्याच्या एम.एच. ३२ एक्यू. ७९९४ क्रमांकाच्या दुचाकीने घरातून बाहेर गेला होता. मात्र, तो परतलाच नाही. याबाबत पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाला गती दिली असता आरोपींसोबत मृतकाचा पैशाचा व्यवहार असल्याने आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार मुलगा सागर शिंगाणे याने पोलिसात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचला होता त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बाेलाविले. तेथे महेंद्रचा दोराने गळा आवळून त्याची हत्या करीत पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे २ गोफ, आणि रोख रक्कम काढून घेत त्याचा मृतदेह आणि दुचाकी विहिरीत पुरवून पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलिसांना दिली. आर्वी पोलिसांनी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास अनिल अर्जुन ठाकरे यांचे शेत गाठून विहिरीत पुरलेली दुचाकी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मध्यरात्रीच चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींना गुुरुवारी दुपारी आर्वीच्या न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे यांच्या निर्देशात पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.  

असा झाला हत्येचा उलगडा...

-    मृतक महेंद्र हा २५ मे रोजीपासून बेपत्ता होता. त्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करुन महेंद्रच्या मोबाईलची माहिती काढली. त्यानुसार सुमित जाधव याच्या मोबाईलवरून शेवटचा कॉल आल्याची माहिती मिळाली आणि तो आरोपी अक्षय सपकाळ आणि शाहरुख शेख याच्या संपर्कात असल्याचे समजले. महेंद्रच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यात पैशाचा व्यवहार होत होता, याच वादातून आरोपींनी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षयला ताब्यात घेत चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आणि हत्येच्या घटनेचा उलगडा झाला.

मृतक महेंद्र राहयचा कुटुंबापासून विभक्त -   महेंद्र शिंगाणे हा नगरपालिका कार्यालयात सफाई जमादार म्हणून कार्यरत होता. तो नेताजी वॉर्डात वास्तव्य करीत होता. त्याने त्याचे घर फईमभाई यांना भाड्याने दिले होते. महेंद्र याला विविध प्रकारचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि मुलासह त्याचा नेहमीच वाद होत असे. याच कारणातून पत्नी व मुलाने सहा महिन्यापूर्वी नेताजी वॉर्डातील घर सोडून ते दोघे राधाकृष्ण नगरीत राहायला गेले होते. त्यामुळे महेंद्र शिंगाणे हा कुटुंबापासून विभक्त राहत होता. 

सर्वत्र शोध पण कानी पडली धक्कादायक माहिती-    मृतक महेंद्र हा एकटाच राहत होता. तो नेहमी गरजूंना मदत लागल्यास त्यांना आर्थिक मदतही करायचा. २५ रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद दाखवत होता. भाडेकरुंनी घरी कुलूप असल्याचे सांगितले. आपले वडील अक्कलकोटला गेले असावे, असा अंदाज मुलगा सागर याने लावला. त्यामुळे अन्सार भाई, गौरव जाजू,  संदीप शिंगणे, संजू भाई,  दिनेश गुप्ता,  बालू वानखडे यांनी महेंद्रचा सर्वत्र शोध घेतला. अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास महेंद्रचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती कानी पडताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली धाव -    आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. याची माहिती वरिष्ठांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांनी आर्वी गाठून घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी