शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील गोदामात जागा नाही; शेतमाल खरेदी वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:46 IST

शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपावसाळ्याच्या तोंडावर कापूस, चणा विकण्याची शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास दीड महिना कापूस खरेदी ठप्प राहिल्याने आता पावसाळ्याच्या तोंडावर कापूस खरेदी अडचणीत आली आहे. कापसाशिवाय चणा विक्रीची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.वर्धा जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून यावर्षी २२ मार्चनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाला. कापसाची सुरू असलेली खरेदी बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही. त्यानंतर लॉकडाऊन शिथील झाल्यावर कापूस खरेदीचे काम सीसीआय व व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आले. मात्र, सीसीआयचा भाव ५ हजार ३०० रुपये क्विंटलवर असल्याने अनेकांनी सीसीआयलाच कापूस देण्यास पसंती दाखविली. दरम्यान, अनेक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतील परप्रांतीय मजूर बाहेरगावी निघून गेले. त्यामुळे कापूस खरेदीचे कामही रेंगाळले. जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पावसाचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीतील कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. व्यापाऱ्यांकडे ४ हजार ३०० रुपये भाव आहे. तशीच परिस्थिती हरभरा व तूर खरेदीची आहे. अद्याप हरभरा व तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. बºयाच ठिकाणी जागा नसल्याचे कारण देत ही खरेदी थांबविण्यात आली आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी येत्या पंधरा दिवसात ही खरेदी आटोपा, अशा सूचना दिल्या आहेत.

दोन हजार शेतकऱ्यांकडून ३४ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदीजिल्ह्यात एकूण ११ हजार १४७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी २ हजार ४५८ शेतकऱ्यांकडील हरभऱ्याची विक्री झाली असून आतापर्यंत ३४ हजार ६७७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.कापूस चौकशीचा ससेमिराशेतकऱ्यांची अडचण लक्षात न घेता सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार खात्याकडून दररोज चौकशीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कापूस विक्रीची चिंता, तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा या दुहेरी संकटात सध्या शेतकरी सापडला आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्यास व्यापारी भाव पाडतील, या भितीने शेतकरी कापूस कसा विकावा, या विवंचनेत आहेत.

जिल्ह्यात जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी खासगी तसेच औद्योगिक विकास महामंडळामध्ये रिकामी असलेली गोदामे शोधून ती सीसीआयला सरकी आणि गाठी ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.- सुनील केदार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.

टॅग्स :Farmerशेतकरी