शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खोडमाशीमुळे यंदाही सोयाबीनची सवंगणी नाहीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सोयाबीनची मळणी केली असता लागवड खर्चही भरुन निघाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मळणीकरिता खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर संकट : आष्टा येथील शेतकऱ्याने दोन एकरात चालविला नांगर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : मागील वर्षीपासून सोयाबीन उत्पादकांसाठी खोडकीड कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षी तरी सोयाबीनचे चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सुरुवातीलाच खोडकीड आणि व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणीची वेळच येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सोयाबीनची मळणी केली असता लागवड खर्चही भरुन निघाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मळणीकरिता खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले. गेल्या वर्षीचा धक्का लक्षात घेऊन यावर्षी सोयाबीनच्या लागवडीत कपात केली. परंतु यंदाही शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पढेगाव व दहेगावसह इतरही गावांमध्ये सोयाबीनवर खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक पिवळे पडायला लागले असून वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. वर्धा तालुक्यातही हीच परिस्थिती असून लगतच्या आष्टा येथील शेतकरी किशोर गुरनुले यांनी खोडकिडीच्या प्रादुर्भावाने दोन एकरातील सोयाबीनमध्ये नांगर चालविला.

पाण्याचा ताण, पुरेसा ओलावा नसताना तणनाशकाची फवारणी, चुनखडीयुक्त जमीन आदी कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. शेतकऱ्यांनी प्रादुभार्वाचा प्रकार लक्षात घेऊन चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात चिलेटेड फेरस सल्फेट किंवा मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्य अधिक २ टक्के किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी. तसेच खोडमाशी, चक्रीभुंगा, पांढरीमाशी याकरिता शिफारशीप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी.एस.एस. ढुमने, कृषी सहायक चिकणी/पढेगाव,

अडीच एकरात सोयाबीनची पेरणी केली. पेरणीही उत्तम प्रकारे साधली, पण कोवळी रोपटे असतानाच खोडकीड व व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी सुद्धा केलीत. तरीही पीक वाचवू शकलो नाही. यातील अर्धेअधिक झाडे नष्ट झालीत.भास्कर काकडे, शेतकरी चिकणी

गेल्यावर्षी आठ एकरात केवळ दीड क्विंटल सोयाबीन झाल्याने खर्चही निघाला नाही. यावर्षी दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली असता यंदाही खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. परिणामी दोन एकरातील सोयाबीनवर नांगर चालवावा लागला. किशोर गुरनुले, शेतकरी,आष्टा

 

टॅग्स :agricultureशेती