फिरत्या पथकाने केली चाचणी : अहवाल वरिष्ठांना सादरआष्टी : तळेगाव येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये रॉकेल मिश्रीत असल्याची तक्रार विपीन उमाळे व हितेश भुतडा यांनी केली होती. याप्रकरणी सोमवारी नागपूर येथील हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मोबाईल व्हॅन पथकाने तळेगाव येथे येवून डिझेलची तपासणी केली. यामध्ये रॉकले अथवा अन्य कुठल्याही पदार्थाची भेसळ नसल्याचा अहवाल दिला. मोबाईल लॅब टेस्ट रिपोर्ट मोटर स्पिरीट १५२७९६२००८ च्या प्राप्त अहवालामध्ये अॅल्यूमिनियम डब्यात साठवलेले नमुना डिझेलची तक्रारकर्त्यांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी उपप्रबंधक चलित प्रयोगशाळा नागपूर येथील विनोद तायडे व त्यांच्या चमुने टाकी क्र. २ पोलिसांच्या ताब्यात दिलेले डिझेल व नोझल मधून येणाऱ्या डिझेलची तपासणी केली. तक्रारकर्त्यांचे अहवाल बघून समाधान झाल्याची माहिती पथकाने दिली. चारचाकी वाहन कशानी खराब झाल्या हे सांगणे कठीण आहे. मात्र त्याचा पेट्रोल पंपावरील डिझेलशी कुठलाही संबंध नसल्याचे तायडे यांनी यावेळी सांगितले.अग्रवाल पेट्रोलपंपाचे गोपालकृष्ण अग्रवाल यांनी चाचणी अहवाल सर्वांसाठी पाहायला उपलब्ध करून दिला. त्यामुळे डिझेलमध्ये रॉकेची भेसळ नाही हे स्पष्ट झाले आहे. गत ३५ वर्षांमध्ये डिझेलमध्ये रॉकेल असल्याची तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली असून यामुळे ग्राहकांना चुकीचा संदेश गेल्याची खंत अग्रवाल यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)
डिझेलच्या नमुन्यात रॉकेल नाही
By admin | Updated: June 15, 2016 02:35 IST