शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही, यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 13:29 IST

भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. मात्र भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- सुधीर खडसे 

 वर्धा - भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. मात्र भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने ऑक्टोबर २००४ मध्ये या संदर्भात अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलाचा त्रास कमी होणाऱ्या बाबी अमलात आणाव्या अशा सूचना केल्या होत्या. मात्र या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कापूस मजूरांच्या व्यथा कायमच आहे. 

जगात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशामध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजूरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धत अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे आजार, कमरेचे आजार होतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधारण परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडलेत. त्यात भारत आणि पाकिस्तान आणि चीन या देशात कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केला होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस मावेल असा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता. मात्र कापूस वेचणाऱ्या महिला स्वखर्चाने हा कोट खरेदी करीत नाही. असे आढळून आले. 

नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी म्हटले आहे की, भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचते. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्यता आहे  परंतू आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. 

यंदा कापूस वेचणी महागलीपूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती. त्यानुसार किलोच्या आधारे रोजी दिली जात होती. यंदा मात्र २०० रूपये रोजीच्या महिला कापूस वेचणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ठेवाव्या लागत आहे. एक महिला साधारणपणे २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रूपयात हे काम व्हायचे आता २०० रूपये द्यावे लागत आहे. म्हणजे ७० रूपये अधिकचे शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्वाचे पिक आहे. व ते नगदी असल्याने शेतकरी यावरच उभा आहे.