एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात होत आहेत कमी कोविड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:11+5:30

मे महिन्यातील पाच दिवसांत जिल्ह्यात १ व ५ मे वगळता इतर इतर तीन दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवट्या आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या तुलनेत कमीच कोविड चाचण्या झाल्यात. तर १ व ५ मे रोजीला जिल्ह्यात अनुक्रमे ४ हजार २९८ तसेच ४ हजार ६३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. असे असले तरी जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असल्याने  प्रत्येक नागरिकाने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

There are fewer covid tests in May than in April | एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात होत आहेत कमी कोविड टेस्ट

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात होत आहेत कमी कोविड टेस्ट

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच : मृतांच्या संख्येत रोज पडतेय भर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ विषाणूचा वाढता संसर्ग तसेच वाढत्या संसर्गाच्या तुलनेत अपुरी पडत असलेली आरोग्य सेवा लक्षात घेवून राज्य शासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. परंतु, अजूनही जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असून एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात जिल्ह्यात कमी कोविड टेस्ट होेत असल्याचे आकडेवारीवरून बघावयास मिळत आहे.
मे महिन्यातील पाच दिवसांत जिल्ह्यात १ व ५ मे वगळता इतर इतर तीन दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवट्या आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या तुलनेत कमीच कोविड चाचण्या झाल्यात. तर १ व ५ मे रोजीला जिल्ह्यात अनुक्रमे ४ हजार २९८ तसेच ४ हजार ६३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. असे असले तरी जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असल्याने  प्रत्येक नागरिकाने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ही दर हाय असून ज्या दिवशी कोविड टेस्ट जास्त त्या दिवशी नवीन रुग्णांची संख्याही वाढत आहे. तर ज्या दिवशी कोविड चाचण्या कमी त्या दिवशी नवीन कोविड बाधितांचा आकडा कमी अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. असे असले तरी कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये म्हणून सध्या प्रशासन ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्रीवर भर देत आहे.

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह
आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन या दोन पद्धतीने कोविड चाचण्या जिल्ह्यात केल्या जात आहेत. ॲन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास त्याचा अहवाल अवघ्या २५ मिनिटांत येतो. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल किमान १६ तासानंतर मिळत आहे. असे असले तरी सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचाच आहे. ॲन्टिजेनपेक्षा आरटीपीसीआर चाचणी ही अधिक प्रभावी असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात.
 

ट्रेस, ट्रेस आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोविड बाधित सापडत असल्याने प्रत्येकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. अजय डवले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

आर्वी, हिंगणघाट उपविभागात टेस्टींग कमीच
 जिल्ह्यात महसूलची वर्धा, हिंगणघाट व आर्वी अशी तीन उपविभाग आहेत. परंतु, तिन्ही महसूल विभागांचा विचार केल्यास कोविड चाचण्या करण्यात वर्धा उपविभाग पुढे आहे. तर उर्वरित दोन्ही उपविभागात पाहिजे तशा प्रमाणात कोविड चाचण्या होत नसल्याचे सांगण्यात आले.
 कोविड चाचणी ही आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन  अशा दोन पद्धतीने केली जाते. परंतु, जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात ॲन्टिजेन किटद्वारे कोविड चाचण्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे आरटीपीसीआर ही गोल्ड स्टॅन्डर मानले जाते.

 

Web Title: There are fewer covid tests in May than in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.