शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

...तर स्कूल बसचा परवाना होईल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:41 PM

प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहनचा बडगा : ८ ते ३१ मे विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत स्कूल बसची तपासणी न करणाऱ्यांच्या वाहनांचा परवानाच निलंबित करण्यात येणार आहे. परिणामी, स्कूल बसची तपासणी न करून घेणाऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया स्कूल बस मालक, शाळा संचालक यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल बसची वेळोवेळी तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे २४ मार्च २०१७ उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. २/२०१२ च्या सुनावणीच्या वेळीस उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाºया बससेची सुरक्षतेच्या दृष्टीने फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली १० मे २०१८ ला झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार व शासन अधिसूचना क्र. एम.व्ही.आर./सी.आर. ६३७/२०१३/का. २ (३)/जा.क्र. ५६०९ दि. ६ एप्रिल २०१७ नुसार स्कूल बस संदर्भात नियमावली लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे क्रमप्राप्तच आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बस वाहनाची फेरतपासणी करण्यासाठी मौजा सालोड हिरापूर येथील वाहन तळावर ८ मे २०१९ ते ३१ मे २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम सुविधेसाठी असली तरी त्याच्याकडे पाठ करणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कठोर कारवाईच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्कूल बस चालक, मालक व शाळा संस्थांनी वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे.फेरतपासणी सर्व स्कूलबससाठी क्रमप्राप्तमोटार वाहन कायदा कलम ५६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरी स्कूल बस फेरतपासणी करून घेणे आवश्यक आहे.सदर फेरतपासणीमध्ये दोष आढळून आल्यास दोष पूर्ण करून सदर स्कूल बस हे सर्व सुरक्षातत्त्वाचे पालन करीत आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे ही फेरतपासणी सर्व स्कूल बस वाहनांना अनिवार्य आहे.जिल्ह्यात एकूण ४७४ स्कूल बसवर्धा जिल्ह्यात शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया छोट्या व मोठ्या अशा एकूण ४७४ स्कूल बसेस असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे. या सर्व स्कूल बसेसची सदर विशेष मोहिमेदरम्यान फेरतपासणी होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या हेतूने ८ ते ३१ मे या कालावधीत स्कूल बसची फेरतपासणी करण्यात येणार आहे. ज्या स्कूलबसची सदर कालावधीत फेरतपासणी केली जाणार नाही त्या वाहनाचा परवाना निलंबीत करण्यात येणार आहे.- विजय तिरणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळा