समुद्रपूर पोलिसांची कारवाई : चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीसमुद्रपूर : येथील मुख्य मार्गावरील कृषी क्रांती सेवा केंद्रात झालेल्या चोरीचा तपास करीत समुद्रपूर पोलिसांनी ४८ तासात आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत हरिष कोराम (२९), संतोष येडमे (२५) या दोघांना अटक करून १३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना समुद्रपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार रविवारी सकाळी सदर चोरीची घटना उघड झाली. याबाबत समुद्रपूर पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याआधारे पोलिसांनी आरोपींचा माग घेत ४८ तासात अटक केली. ही कारवाई ठाणेदार रणजितसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चेतन मराठे, अजय अवचट, अमोल खाडे अजय घुसे, राहुल गिरडे, यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)आर्वी- शेतातील पितळीचे नोझल व पाईप चोरीला गेल्याची घटना वाढोणा शिवारात घडली. याबाबत शेतकरी मनोज धांदे यांनी बुधवारी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मनोज धांदे यांचे वाढोणा येथील भिवापूर शिवारात शेत आहे. पिकाला ओलित करण्यासाठी त्यांनी पाईप व पितळी नोझल विकत घेतले होते. दरम्यान हे नोझल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. यात त्यांचे नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. या परिसरात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
चोरीतील आरोपी ४८ तासांत गजाआड
By admin | Updated: September 24, 2015 02:44 IST