शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

तलवार अन् रॉडने युवकास जबर मारहाण; एकास अटक

By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2023 16:14 IST

शांतीनगर परिसरातील घटनेने खळबळ

वर्धा : पुलाखाली बसून असलेल्या युवकावर दोघांनी तलवार आणि रॉडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शांतीनगर परिसरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी युवकाच्या मृत्युपूर्व बयाणावरुन २७ रोजी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. प्रथम छत्रपती कुसाडे (२१) रा. शांतीनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कपिल लक्ष्मण शेरेकार असे जखमीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कपिल शेरेकार हा शांतीनगर परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली एकटाच बसून असतानाच तेथे प्रथम कुसाडे आणि त्याचा लहान भाऊ आला. कपिलने त्यांना तुम्ही येथे थांबू नका, असे म्हटले असता दोघेही तेथून निघून गेले आणि काहीवेळाने दोघांनी हातात तलवार आणि रॉड घेऊन कपिलच्या डोक्यावर व डावया हातावर जबर मारहाण करुन त्यास गंभीर जखमी केले. पोलिसांनी जखमी कपिलच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन आरोपी प्रथमला अटक करुन गुन्हा दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी गेडाम यांनी दिली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा