शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्रतील पाणवठ्यांनी तहान भागली, वन्यप्राण्यांची गावाकडे येणारी धाव थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

वन्यप्राण्यांची बरीच संख्या आहे. ते पाण्याच्या शोधत जाऊन उघड्या विहिरीत पडण्याच्याही घटना वाढतात. यासह मनुष्य आणि पाळीव जनावरांवरही हल्ले होतात. हे टाळण्यासाठी उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक उपवनसंरक्षक बोबडे यांच्या निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वात आर्वी वन परिक्षेत्रातील प्रत्येक नियत क्षेत्रात एक याप्रमाणे पाणवठे तयार केले.  

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  वर्धा वन विभागातील आर्वी वन परिक्षेत्रांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाचं बफर क्षेत्र मोडत असल्याने, या परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या घनदाट वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचाही अधिवास मोठा आहे. आता तापत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांच्याही जीवाची काहिली होत असून, त्यांना पाणी मिळाले नाही तर ते गावाकडे धाव घेतात. मात्र, वन विभागाने वनक्षेत्रात पाणवठ्यांची सोय करून त्यामध्ये सोलर पंप व टँकरद्वारे नियमित पाणी टाकले जात असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागली. परिणामी, गावाकडे धाव घेऊन होणारा मानव-वन्यजीव संघर्षही थांबला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती सुरू होते. या क्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, वानर, मोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांची बरीच संख्या आहे. ते पाण्याच्या शोधत जाऊन उघड्या विहिरीत पडण्याच्याही घटना वाढतात. यासह मनुष्य आणि पाळीव जनावरांवरही हल्ले होतात. हे टाळण्यासाठी उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक उपवनसंरक्षक बोबडे यांच्या निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वात आर्वी वन परिक्षेत्रातील प्रत्येक नियत क्षेत्रात एक याप्रमाणे पाणवठे तयार केले.  काही ठिकाणी नैसर्गिक झऱ्यातील गाळ उपसण्यात आला आहे तर काही वनतलावाचे खोलीकरण करुन पुनरुज्जीवित करण्यात आले. यावर्षी वनकर्मचारी व गावकरी यांच्या श्रमदानातून अत्यंत कमी किमतीत १० अस्थायी पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. पाणवठ्यावर पाण्याकरिता वन्यप्राणी एकत्र येत असल्याने त्यांची शिकार होण्याचा धोका असतो. हा धोका लक्षात घेवून वनविभागच्या कर्मचाऱ्यांनी या वनपरिक्षेत्रातील सर्व पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप लावला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्याचे नियमितपणे मॉनिटरिंग केली जात आहे.

अस्थायी पाणवठ्यासाठी थोडी जमीन बशीच्या आकाराची खोदून त्यावर गवत आच्छादलेले असते. त्यावर ताडपत्री पसरवून शेवटी वरून दगडाची पिचिंग करायची असते. या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने अत्यंत कमी किमतीत हा पाणवठा तयार होतो. तो पाणवठाही नैसर्गिक वाटत असल्याने वन्यप्राणीही त्यालाच पसंती देतात. - नितीन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग