शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड घेऊन जाणारे भरधाव वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

आर्वी  तालुक्यातील  पाचोड येथील भागचंद पवार यांच्या मुलीचा विवाह आर्वीत आयोजित असल्याने लग्नाचे पाहुणे घेऊन एम. एच. ४० /४१४८ क्रमांकाचा मालवाहू आर्वीच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू आर्वी मार्गावरील वाढोणा  घाट परिसरात आला असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन उलटले.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा (आर्वी) : लग्नाचे पाहुणे घेऊन आर्वीच्या दिशेने येत असलेला  मालवाहू अनियंत्रित होत उलटला. या अपघातात एकूण १७ प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी सकाळी आर्वी मार्गावर झाला असून प्रेमसिंग जाधव असले मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.आर्वी  तालुक्यातील  पाचोड येथील भागचंद पवार यांच्या मुलीचा विवाह आर्वीत आयोजित असल्याने लग्नाचे पाहुणे घेऊन एम. एच. ४० /४१४८ क्रमांकाचा मालवाहू आर्वीच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू आर्वी मार्गावरील वाढोणा  घाट परिसरात आला असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन उलटले. यात वाहनातील यशोदा  पवार, अनिल राठोड, भवरी राठोड, प्रीतम नंदू जाधव, कमलनाथ जाधव, प्रेमसिंग जाधव, गायत्री किसन जाधव, अर्जुन जाधव, अंजली राठोड, चंचल जाधव, कल्पना राठोड, राजेश जाधव, समुद्र रुमाल जाधव, लखन रामू चव्हाण, वासुदेव चव्हाण, गुणवंत जाधव, सिद्धांत जाधव, सुमन माणिक राठोड हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना आर्वी येथील रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चौघांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आमदारांनी गाठले आर्वीचे रुग्णालय-    अपघातात जखमी झालेल्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळताच आ. दादाराव केचे यांनी तातडीने आर्वीचे रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली. शिवाय, गंभीर जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

 

टॅग्स :Accidentअपघात