शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

युवा प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ संपत आलाय, लाडक्या भावांवर पुन्हा बेरोजगारीची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:34 IST

पुढील महिन्यात करार समाप्त : हजारो युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार

सटवाजी वानोळे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक युवकांना सहा महिन्यांकरिता रोजगार उपलब्ध करून दिला. आता या योजनेचा कार्यकाळ संपत आहे. परंतु या लाडक्या भावांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून या सुशिक्षित युवकांवर पुन्हा बेरोजगारीची टांगती तलवार लटकते आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी लाडका भाऊ योजना आणली होती. या योजनेअंतर्गत युवकांना सहा महिन्यांकरिता विविध सरकारी कार्यालय व खासगी आस्थापनात काम देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दीड हजारांपेक्षा जास्त युवकाची निवड करण्यात आली. सहा ते १० हजार रुपये या अल्प मानधनावर त्यांना कामही देण्यात आले. परंतु या सहा महिन्यांच्या काळात काही लोकांचे वेतन झाले तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. आज ना उद्या देईल अशी आशा उराशी बाळगून असतानाच सहा महिन्यानंतर पुढे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे. अशातच या युवकाचा आता कार्यकाळ संपत चाललेला आहे. 

हजेरीत त्रुटी असल्याने लागतोय वेळ आस्थापनांकडून प्राप्त हजेरीवरून मानधन अदा केले जाते. मात्र यात बऱ्याच आस्थापनांकडून हजेरी नोंदीत त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्तीसाठी वेळ जातो आहे. शिवाय काहींचे बँकेत केवायसी अपडेट नसल्याने तर काहींचे आधार लिंक नसल्याने मानधन देण्यास दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन जीआरला दुजोरा या संदर्भात वरिष्ठ स्तरावर रफ ड्राफ्टिंग सुरू आहे. आयुक्त, सहायक आयुक्त यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच या संदर्भात नवीन जीआर निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या संदर्भात अधीकृत माहिती अद्याप नसल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यांपासून अनेकांचे रखडले मानधन सहा महिन्यांपूर्वी रोजगार मिळालेल्या बेरोजगारांपैकी बऱ्याच सुशिक्षित बेरोजगारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले आहे. यात आस्थापनांनी हजेरीची नोंद करताना चुका केल्याने हे मानधन रखडल्याचे सांगण्यात आले आहे. तर काहींची बँक केवायसी झाली नसल्याने हे मानधन झाले नसल्याचे सागंण्यात आले आहे. रखडलेले मानधन तातडीने द्यावे या संदर्भात युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले आहे. मात्र यावर अद्याप सकारात्मक निर्णय झाला नाही.

१६५७ युवकांच्या हाताला कामया योजनेअंतर्गत शासकीय, तसेच खासगी आस्थापनात रिक्त असलेल्या जागांसाठी शिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात आ. यात शासकीय विभागात १ हजार २३५ तर खासगी आस्थापनांत ४२२ अशा १६५७ जणांना काम मिळाले.

"ज्या आस्थापनात योजनेअंतर्गत युवकांना रोजगार दिला आहे. त्या आस्थापनांकडून सेवा दिल्याचे त्यांना अनुभव प्रमाणपत्र देऊन सेवा समाप्त केली जाणार आहे. तर नव्या बेरोजगारांना याठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे." - नीता अवघड, सहायक कौशल्य विकास वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाUnemploymentबेरोजगारी