शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रकने घेतला पेट; वाहनाबाहेर दोघांनी उडी घेतली थेट, अन् टळली यमदूताशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने मोठे धाडस करून वाहनावर नियंत्रण मिळवित वाहन रस्त्याकडेला उभे करून वाहनातील दोघांनीही वाहनाबाहेर वेळीच पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेल अशीच काहीशी घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्यासुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात घडली. तिरोडाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकचालकासह क्लिनरने रस्त्याकडेला वाहन उभे करीत थेट वाहनाबाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे हे दोघेही थोडक्यात बचावले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकमधील कोंबड्यांचे खाद्य तसेच ट्रक जळून कोळसा झाला. शिवदास झुमरू कोळी (वय ५५) आणि राकेश बापूराव मोरे (१९) असे अनुक्रमे थोडक्यात बचावलेल्या चालक व क्लिनरचे नाव आहे.

टँकर बोलावून मिळविले परिस्थितीवर नियंत्रण-    ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत टोल प्लाझा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पाण्याचा टँकर बोलावून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

जेवणासाठी थांबण्यापूर्वीच ट्रकने घेतला पेट-    साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने मोठे धाडस करून वाहनावर नियंत्रण मिळवित वाहन रस्त्याकडेला उभे करून वाहनातील दोघांनीही वाहनाबाहेर वेळीच पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.

ट्रकमध्ये होते कोंबड्यांचे खाद्य-    नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात जळून कोळसा झालेला हा ट्रक कोंबड्यांचे खाद्य घेऊन तिरोडाच्या दिशेने जात होता. या घटनेत ट्रकमधील कोंबड्यांचे संपूर्ण खाद्य आणि ट्रक जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.

अवघ्या काही मिनिटांत झाले होत्याचे नव्हते-    चालक व क्लिनरने वेळीच वाहनाबाहेर पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, आगीने अवघ्या काही क्षणातच ट्रकला आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले.  या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

केबीनमध्येच झाले शॉर्टसर्किट

-  ट्रकच्या केबीनमध्येच शॉर्टसर्किट होऊन ट्रकने अचानक पेट घेतला. आग ट्रकला आपल्या कवेत घेत असल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनरने वेळीच वाहनाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने  ते थोडक्यात बचावले. पण या घटनेत ट्रक व ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले. 

 

टॅग्स :fireआग