शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

विदर्भात उन्हाचा कहर; शाळांना १४ दिवस अधिकच्या सुट्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 19:00 IST

Wardha News आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ दिवस अधिकच्या मिळणार आहेत.

ठळक मुद्दे२७ जूनला वाजणार घंटाराज्यात २ मे पासून समर व्हॅकेशन

वर्धा : विदर्भात सूर्यनारायण सध्या आग ओकत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विदर्भात तापमान अधिक असल्याने आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात एकाचवेळी सर्व शाळांना सुट्ट्या लागणार असल्या तरी विदर्भातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ दिवस अधिकच्या मिळणार आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळणार की नाही? मिळाल्या तरी किती दिवसांच्या असतील? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही मनात निर्माण झाले होते. अखेर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२१-२२ च्या उन्हाळी सुट्ट्या व सन २०२२-२३ चे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्याकरिता २ मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागू करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जून महिन्यातही विदर्भातील तापमान अधिक राहत असल्याने विदर्भातील शाळा दरवर्षीप्रमाणे २७ जूनपासून सुरू होणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा