शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयातील चौकशी प्रकरण पुढे सरकेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:06 IST

पुन्हा समिती गठित : अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बालरोग विभागात कार्यरत डॉ. संजय गाठे यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढणारा नोटीस दिल्याच्या कारणातून डॉ. गाठे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानखेडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणाची तीन सदस्यीय समिती गठित करीत सोमवार, दि. १८ रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी करीत वरिष्ठांकडे अहवाल सादर केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगण्यात आले. मात्र यात केवळ मारहाण प्रकरणाची चौकशी केली. ममो दिलेल्या प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू असल्याने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना अशी शंका वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एसएनसीयूत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे त्याच्या खासगी रुग्णालयातून फोनवरून बालकाचे उपचार करीत असल्याची बाब पुढे आल्याने हा प्रकार एनएससीयूतील बालमृत्यूत भर घालणारा आहे, अशी टिप्पणी करणारी नोटीस डॉ. गाठे यांना बजावला होता. या नोटिसीच्या कारणावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गाठे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांना शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे मारण्याची धकमी दिली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने डॉ. मनोज सक्तेपार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करीत सोमवारी सकाळी १० वाजता संजय गाठेंसह अन्य अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी चौकशी करीत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुमंत वाघ यांनी सांगतिले. यात मारहाणप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. मेमो दिल्याप्रकरणी अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

पाच सदस्यीय समिती गठीत जिल्हा सामान्य रुग्णालयात बालमृत्यू मेमो दिल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली असल्याचे सांगण्यात आले आहे. यात डॉ. आशिष लांडे, अध्यक्षतेत वर्ग एकच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य डॉक्टरांचा समावेश असल्याचे माहिती खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

"मारहाण प्रकरणात पाच- सहाजणांचे बयाण नोंदविण्यात आले. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. बालमृत्यू प्रकरण मेमो संदर्भात समिती गठित केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे." - डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा