शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्य लादून त्याची वाहतूक करणे कायदेशीर गुन्हाच आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करते. ओव्हरलोडचा ठपका ठेऊन मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

रात्री ओव्हरलोड आणि ओव्हारस्पीडही१ रात्रीच्या सुमारास विविध रस्त्यांवर वाहनांची जास्त वर्दळ राहत नसल्याने तसेच ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारीही राहत नसल्याने याच संधीचे सोनं नियमांना बगल देणारे वाहन चालक करतात.

२ शहरातील विविध  भागात दिवसाला वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहतात. पण रात्रीच्या सुमारास या भागात पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीड वाहने धावत असल्याचे वास्तव आहे.

३ ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीट वाहनांमुळे अपघाताचा जास्त धोका राहतो. पण सध्या रात्रीच्या सुमारास वर्धा शहरातून ही अवजड वाहने मनमर्जीनेच पळविली जात असल्याचे दिसून येते.

४ हजार ४३१ वाहनांची तपासणी

-    मागील तीन महिन्यांच्या काळात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून तब्बल ४ हजार ४३१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ओव्हरलोडची तब्बल १८ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मोहीम पुढेही सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ओव्हरलोडचा ठपका ठेवून १८ वाहन चालकांकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. सुरक्षित प्रवास या हेतूने प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.- धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस