शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सात पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीचा बिमोड बऱ्यापैकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

वर्धा उपविभागात मागील वर्षभरात खुनाच्या १८ घटना, अत्याचाराच्या २० घटना, विनयभंगाच्या ७३ तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या ११ घटना घडल्या. या सर्व घटनांची उकल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना अटक करुन गुन्ह्याची उकल केली आहे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा उपविभागात गुन्हेगारी डोके वर काढत असतानाच पोलीस यंत्रणा राबवत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे वर्धा उपविभागाला अशांत करु पाहणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिसांना बंदोबस्त करण्यात बहुतांश प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. वर्धा उपविभागात येणाऱ्या वर्धा, सेवाग्राम, सावंगी, सेलू, रामनगर, सिंदी, दहेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांची तसेच चोरी, घरफोडींच्या घटनांची ७० टक्के उकल करण्यात वर्धा उपविभाग यशस्वी ठरला आहे. वर्धा उपविभागात मागील वर्षभरात खुनाच्या १८ घटना, अत्याचाराच्या २० घटना, विनयभंगाच्या ७३ तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या ११ घटना घडल्या. या सर्व घटनांची उकल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना अटक करुन गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली असून यापुढेही अशी कारवाई केली जाणार आहे.

रामनगर हद्दीतील ३ गुन्हेगारी टोळ्या हद्दपार -  रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व होते. या वर्चस्व वादातून अनेकदा वाद उफाळत होते. -  मात्र, मागील वर्षभरात या तिन्ही टोळ्यांतील तब्बल १४ गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आल्याने रामनगर हद्दीत मारहाण, खुनाचा प्रयत्न, आदींसारख्या गंभीर घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. 

अपघातांच्या गुन्ह्यात १० टक्क्यांनी वाढ -   गुन्हेगारीचा बिमोड करण्यात वर्धा उपविभाग यशस्वी झाला असला तरी अपघातांच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाल्याचे दिसून आले. -   विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, हे मात्र तितकेच खरे. 

पोक्सो कायद्यान्वये ३१ गुन्ह्यांची उकल -   बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक पोक्सो कायद्यान्वये मागील वर्षभरात वर्धा उपविभागात तब्बल ३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. त्यात १५ गुन्हे हे विनयभंगाचे तर १६ गुन्हे हे लैंगिक शोषणाचे असून, यातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी आता कारागृहाची हवा खात आहेत. 

 

टॅग्स :Policeपोलिस